पुरस्कार
पुरस्कार  
मुख्य बातम्या

खरपुडी कृषी विज्ञान केंद्राला ‘निक्रा केव्हीके’ पुरस्कार

टीम अॅग्रोवन

जालना : जिल्ह्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रास केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्थेच्या वतीने (सीआरआयडीए) ‘सर्वोत्कृष्ट निक्रा केव्हीके-२०१९’ या पुरस्काराने मंगळवारी (ता.४) हैदराबाद येथे सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय हवामान अनुकूल शेती नवकल्पना प्रकल्पांतर्गत केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘निक्रा' म्हणजे राष्ट्रीय हवामान अनुकूल शेती नवकल्पना प्रकल्प देशातील १२१ हवामान संवेदनशील जिल्ह्यात २०११ पासून कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविला जात आहे. या कृषी विज्ञान केंद्रांची वार्षिक आढावा कार्यशाळा हैद्राबाद येथे ४ ते ६ जून या कालावधीत होत आहे. या कार्यशाळेचे औचत्य साधून हे पुरस्कार देण्यात आले. बदलत्या हवामान परिस्थितीशी लढा देण्यासाठी प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राने काय प्रयत्न केलेत व कोणते हवामान अनुकूल तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले, त्याचा किती शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा झाला या निकषावर आधारित प्रत्येक झोनमधून दोन केव्हीकेंना हे पुरस्कार देण्यात आले.  देशात एकूण ११ झोन आहेत. खरपुडी हे हा पुरस्कार मिळणारे महाराष्ट्रातील एकमेव केव्हीके आहे. बदनापूर तालुक्‍यातील कडेगाव आणि वरुडी या गावात कृषी विज्ञान केंद्राने रेशीम उद्योग, शेळीपालन, कुक्कुटपालन, शेततळे, हवामान अनुकूल वाणांचा प्रसार, भाडेतत्त्वावर अवजारे बॅंक, कापूस पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन, शेंदरी बोड अळीचे नियंत्रण, विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान, मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न या बाबींची नोंद घेण्यात आली. या कामासाठी कृषी विभाग, रेशीम विभाग व इतर तत्सम विभागांचेही सहकार्य मिळाले.  भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक (कृषी विस्तार) डॉ. ए. के. सिंग यांचे हस्ते व सहाय्यक महानिदेशक (नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन) डॉ. एस. भास्कर,  हैद्राबादच्या केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी. रवींद्र चारी, डॉ. एम. प्रभाकर, डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT