संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

राज्यात खरिपात ९४ टक्के पेरा

टीम अॅग्रोवन

पुणे   : राज्यभरात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपावर आलेले मळभ दूर झाले आहे. आतापर्यंत ९४ टक्के पेरा झाला असून, आता केवळ धानाच्या पुनर्लागवडीची कामे राज्यात सुरू आहेत.

राज्यातील ३० तालुक्यांमध्ये ऑगस्टच्या पंधरवड्यापर्यंत अपेक्षित पाऊस नव्हता. त्यामुळे काही भागातील पिके जळू लागली होती. पावसाअभावी कीडरोगाच्या प्रसाराला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, गेल्या आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे खरिपावरील संभाव्य संकटाची तीव्रता कमी झाल्याचे मानले जात आहे.

राज्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील १४० लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास १३३ लाख हेक्टरवर पेरा पूर्ण केला आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा १३८ लाख हेक्टरच्या आसपास झालेला होता. जुनच्या अखेरीस पावसाचा खंड पडल्यामुळे यंदा पेरण्या काही भागात रेंगाळल्या. त्यानंतर पुन्हा वाढीच्या अवस्थेला पूरक ठरणारा पाऊस गेल्या काही दिवसांपासून झाला नव्हता. आता मात्र पिके संकटातून बाहेर आली आहेत, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्यातील खरीप पेरण्यांचा कल पाहिल्यास सोयबीनच्या पेऱ्यात चांगली वाढ झाली आहे. मात्र, कपाशीचा पेरा गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५.५३ लाख हेक्टर आहे. गेल्या हंगामात पेरा ३८ लाख हेक्टरच्या आसपास होता. यंदा मात्र सोयाबीनचा पेरा ३९ लाख हेक्टरपर्यंत झाला आहे.

कपाशीचे सरासरी क्षेत्र ४२ लाख हेक्टर असताना यंदा पेरा ४० लाख ६२ हजार हेक्टरवर स्थिरावला आहे. कडधान्याचा पेरादेखील काही प्रमाणात यंदा कमी झाला आहे. कडधान्याचे राज्याचे सरासरी क्षेत्र २०.५४ लाख हेक्टरचे असून, गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी याच कालावधीत २२.५६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरा केला होता. यंदा आतापर्यंत २० लाख २८ हजार हेक्टरच्या आसपास कडधान्यांचा पेरा झाला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT