Kharif planning from agriculture department in Amravati division
Kharif planning from agriculture department in Amravati division 
मुख्य बातम्या

अमरावती विभागात कृषी विभागाकडून खरीप नियोजन

टीम अॅग्रोवन

अमरावती ः लॉकडाऊन असतानाही कृषी विभागाकडून खरीप संदर्भातील कामांना गती देण्यात आली आहे. अमरावती विभागातील यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम येथील खरीप आढावा बैठका पार पडल्यानंतर बुधवारी (ता. २९) अमरावती तर गुरुवारी (ता. ३०) अकोला येथे खरीप आढावा बैठक होईल.

खरीप हंगाम तोंडावर असल्याने प्रशासनाकडून त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हानिहाय्य खते, बियाणे उपलब्धतेचा आढावा घेतला जात आहे. अमरावती विभागाअंतर्गत अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. यातील वाशीम, यवतमाळ व बुलडाणा या तीन जिल्ह्यात खरीप आढावा बैठका पार पडल्या.

त्या- त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकांमध्ये बियाणे पुरवठा तसेच पीककर्ज वितरण सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर आता बुधवारी (ता. २९) अमरावती तर गुरुवारी (ता. ३०) अकोला जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप आढावा बैठक होणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा पुरवठा सुरळीत होईल याकरिता नियोजन करण्यात आले आहे. खरीप आढावा बैठका त्याकरिता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झाल्या. आता केवळ अमरावती आणि अकोला जिल्ह्याचा आढावा राहिला आहे. - सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT