Katepurna project filled, water reserves increased 
मुख्य बातम्या

काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात वाढ

टीम अॅग्रोवन

अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न स्वरूपात पाऊस झाला. परंतु गेल्या काही वर्षात पहिल्यांदा जुलै-ऑगस्ट दरम्यान प्रकल्प तुडुंब भरू लागले आहेत. वऱ्हाडातील बहुतांश मोठे प्रकल्प समाधानकारक भरले आहेत. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा हा मोठा प्रकल्प सध्या ९० टक्क्यांपर्यंत पोचला असून त्यात २.७४ टीएमसी साठा तयार झाला आहे. तर लघू प्रकल्पही जोमाने भरू लागल्याने आगामी रब्बी हंगामासाठी ही चांगली परिस्थिती मानली जात आहे.

या विभागात काटेपूर्णा, खडकपूर्णा, वान, नळगंगा, पेनटाकळी हे मोठे प्रकल्प आहेत. यातील बहुतांश प्रकल्पात चांगला पाणी साठा तयार झालेला आहे. केवळ वान या प्रकल्पात अद्यापही पुरेसा साठा झालेला नाही. वान धरणाचे क्षेत्र हे सातपुडा पर्वत रांगांमध्ये आहे. या धरणक्षेत्रात अद्याप जोरदार पाऊस न झाल्याने वानची पातळी ५० टक्क्यांच्या आत आहे.

दुसरीकडे धरणांच्या क्षेत्रात सातत्याने चांगला पाऊस झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पात वेगाने वाढ होत आहे. बुधवारी (ता. १२) सकाळी हा प्रकल्प ९० टक्के भरला. यात २.७२ टीएमसी साठा तयार झाला. काटेपूर्णा प्रकल्पाचे क्षेत्र प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यातील भाग आहे. तिकडील पावसाच्या जोरावर सातत्याने वाढ होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात २.५२ टीएमसी साठा आहे.  पेनटाकळी, नळगंगा प्रकल्पातही साठा सुधारला. तरीही वान प्रमाणेच नळगंगा प्रकल्प क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मध्यम प्रकल्पही भरले वऱ्हाडातील सोनल, एकबुर्जी (जि. वाशीम), मस, उतावळी (जि. बुलडाणा) हे चार मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर अकोल्यातील निर्गुणा (६४ टक्के), मोर्णा (८३), वाशीममधील अडाण (७४.२३), बुलडाण्यातील ज्ञानगंगा (८४.९४), पलढग (५१.६६), कोराडी (९१.४५), तोरणा (५९.६) असे भरले आहेत. तर अनेक लघु प्रकल्प ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात भरले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

प्रकल्पांतील साठा
प्रकल्प टीएमसी टक्केवारी
काटेपूर्णा २.७४ ९०.०८ टक्के
वान १.२२ ४२.१७
खडकपूर्णा २.५२ ७६.४२
नळगंगा १.४४ ५८.९३
पेनटाकळी १.५२ ७१.८२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT