ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी शक्‍य
ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी शक्‍य 
मुख्य बातम्या

खानदेशात ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी शक्‍य

टीम अॅग्रोवन

जळगाव ः शासनाकडून भरडधान्य म्हणजेच ज्वारी, मका आदी खरेदीची तयारी सुरू झालेली असतानाच खानदेशात ज्वारी पिकाची स्थिती बऱ्यापैकी आहे. दिवाळीपूर्वी ज्वारीची कापणी पूर्ण होऊ शकते. मध्यंतरी ज्वारीवर दिसलेली लष्करी अळी नंतर पिकावरून दूर झाल्याने पीकस्थिती बऱ्यापैकी आहे. 

खानदेशात चारा, धान्यासाठी पशुधनपालक, मोठे शेतकरी ज्वारीची पेरणी करतात. जळगावमधील चोपडा, रावेर, यावल, धुळ्यातील शिरपूर, शहादा, तळोदा भागांत केळी, गहू आदी पिकांसाठी बेवड म्हणूनही ज्वारीची पेरणी केली जाते. यंदा पेरणी वेळेत म्हणजेच २० जूनपूर्वी झाली होती. पिकाची वाढ उत्तम झाली. परंतु पेरणीनंतर महिनाभरात पिकावर लष्करी अळी दिसून आली होती. नंतर अगदी निसवणीपर्यंत ही अळी ज्वारी पिकावर दिसत होती. 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, जामनेर या भागांतून ज्वारीवर लष्करी अळी आल्याच्या व त्यामुळे पिकाचे १० ते १५ टक्के नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी उपाययोजनाही सुरू केल्या. त्यात पिकाच्या पोग्यात वाळू किंवा निर्देशीत कीडनाशके टाकली होती. ऑगस्टच्या मध्यानंतर झालेल्या जोरदार पावसात पिकाची वाढ झाली. नंतर निसवणही जोमात झाली. सप्टेंबरमध्ये पिकावरील लष्करी अळीच्या तक्रारीदेखील कमी झाल्या. 

सद्यःस्थितीत पिकात कणसे पक्व होत आहेत. वाढ पाच ते सात फुटांपर्यंत असल्याने चाराही चांगला मिळेल. तसेच उत्पादनही चांगले साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. खानदेशात मिळून सुमारे ४० हजार हेक्‍टरवर ज्वारी आहे. या पिकावर नंतर अनेक शेतकरी केळी, गहू, हरभरा पेरणीचे नियोजन करीत आहेत. पिकाची कापणी दिवाळीपूर्वी सुरू होईल. तर मळणी नोव्हेंबरच्या सुरवातीला होऊन पीक हाती येईल. 

शासकीय केंद्रात दर्जेदार ज्वारीची २५५० व २५७० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी केली जाणार आहे. यामुळे यंदा ज्वारीचे दरही टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे. उत्पादन १०० टक्के साध्य होणार असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT