जळगाव जिल्ह्यात किसान सन्मान निधीची कामे रखडली
जळगाव जिल्ह्यात किसान सन्मान निधीची कामे रखडली 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात किसान सन्मान निधीची कामे रखडली

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी फक्त साडेतीन लाख शेतकऱ्यांनाच किसान सन्मान निधीतून प्रतिमहिना ५०० रुपये मिळत आहेत. अनेक शेतकरी बॅंक खाते क्रमांक चुकविल्याने किंवा आधार क्रमांकाबाबत पोर्टलमध्ये माहिती भरताना चुका केल्याने या योजनेपासून वंचित आहेत.  प्रशासन वंचित शेतकऱ्यांबाबत जबाबदारी घ्यायला तयार नाही. जळगाव, धरणगाव, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव भागातील अनेक शेतकरी या निधीसंबंधी तहसील कार्यालयात चकरा मारीत आहेत. परंतु त्यांची समस्या सुटत नसल्याचे चित्र आहे. चुका प्रशासनातील मंडळी, ऑपरेटरनी केल्या आहेत. त्याचे नुकसान मात्र शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. शेतकरी तलाठ्यांकडे गेल्यास तेथे त्यांना अर्ज करा व नायब तहसीलदारांकडे जा, असे सांगितले जाते. नायब तहसीलदार तलाठ्याकडे अर्ज द्या, असे सांगून परतावून  लावतात.   अनेक शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक याची माहिती पोर्टलवर भरताना ऑपरेटर किंवा संबंधितांनी चुका केल्या आहेत. त्या दुरुस्तीसंबंधी पोर्टलबाबतचे लॉगइन आयडी फक्त नायब तहसीलदार व संबंधित कर्मचाऱ्याला दिले आहेत. हे कर्मचारी कार्यालयात नसले की या संदर्भातील दुरुस्ती होत नाही. त्यांच्यामागे शेतकऱ्यांना वणवण फिरावे लागते. मध्यंतरी या संदर्भातील अडचण घेऊन चाळीसगाव, जळगाव, जामनेर भागातील काही शेतकरी जिल्हास्तरावर राष्ट्रीय सूचना केंद्र (एनआयसी)मध्ये आले होते. तेथे या दुरुस्त्या करण्याचा प्रयत्न झाला. परंतु संबंधित तालुक्‍यांसाठी दुरुस्तीबाबत स्वतंत्र लॉगइन आयडी दिले आहेत. त्याची माहिती नायब तहसीलदार किंवा संजय गांधी निराधार योजना कक्षातील कर्मचाऱ्यांकडे आहेत. ही मंडळी सहकार्य करीत नसल्याने दुरुस्तीचे काम रखडले असून, अद्याप जवळपास निम्मे शेतकरी या योजनेतून मदतनिधी मिळवू शकत नसल्याची स्थिती आहे. या योजनेचे कामकाज करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी व अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी शेतकरी रमेश मराठे (चोपडा) यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT