जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खते
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खते 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खते

टीम अॅग्रोवन

जळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. रावेर, चोपडा व यावल भागात शेतकरी खतांचा संचयही करून घेत आहेत. खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, युरिया व इतर सरळ खते आणि मिश्र खतांचा मुबलक पुरवठा झाला आहे. कुठलीही खतटंचाई यंदा भासणार नाही, असा दावा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केला आहे. 

जिल्हा खतांच्या वापरात राज्यात आघाडीवर आहे. यंदा खरिपात युरियाची एक लाख ३४ हजार मेट्रिक टन, डीएपीची २० हजार, सुपर फॉस्फेटची ४५ हजार मेट्रिक टन, पोटॅशची ५५ हजार मेट्रिक टन आणि मिश्र खतांची एकूण ८६ हजार मेट्रिक टन एवढी मागणी कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे केली होती. जेवढी मागणी कृषी विभागाने खते मिळण्यासंबंधी आयुक्‍तालयाकडे केली मागणीनुसार पुरवठा लक्ष्यांक मंजूर झालेला नसला तरी जिल्ह्यास युरियाचा मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत ३० टक्के पुरवठा झाला आहे. मागील हंगामातील युरियाही शिल्लक असून, शिल्लक युरिया धरून सुमारे ६० टक्के पुरवठा युरियाचा झाला आहे. पोटॅश व फॉस्फेटचा पुरवठा मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत २५ टक्के झाला आहे. दर महिन्याचा पुरवठा लक्ष्यांक कंपन्यांना दिला जात आहे. त्यानुसार पुरवठा सुरू असून, डीएपीचा मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत ३५ टक्के पुरवठा झाल्याचा दावा करण्यात आला. जिल्ह्यात युरियाचा सुमारे ३० हजार मेट्रिक टन साठा आहे. तर मिश्र खतांचा एकूण सुमारे २५ हजार मेट्रिक टन साठा आहे, अशी माहिती मिळाली.  काही कंपन्यांच्या डीएपी, पोटॅश व मिश्र खतांच्या दरात वाढ झाली आहे. किमान ५५  व कमाल १३० रुपये एवढी वाढ एका गोणीमागे झाली आहे. याचा फटका यंदा शेतकऱ्यांना बसणार आहे; परंतु दरवाढीने खतांचा वापर कमी होईल, असा दावा खतपुरवठादार व काही विक्रेत्यांनी केला आहे.   खतांची मागणी एक दोन पाऊस झाल्यानंतर वाढेल. तसेच यंदा पूर्वहंगामी कापूस लागवड उशिराने होत असल्याने पूर्वहंगामी कापूस उत्पादकही जूनच्या मध्यानंतरच खतांची खरेदी करतील, असे संकेत मिळत आहेत.  मंजूर मासिक पुरवठा लक्ष्यांकाच्या तुलनेत युरियाचा ३५ टक्के पुरवठा झाला आहे. टंचाई नाही. तसेच मागील हंगामातील युरिया व मिश्र खतांचा साठाही शिल्लक आहे.  - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी,  जिल्हा परिषद, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT