खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र आणण्याचे प्रयत्न
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र आणण्याचे प्रयत्न 
मुख्य बातम्या

खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र आणण्याचे प्रयत्न

टीम अॅग्रोवन

जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचा वाद सर्वश्रुत आहे, मात्र जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत दोघांना एकत्र आणून बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यासाठी शिवसेना नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील मध्यस्थी करणार आहेत. त्यांची सफल होणार काय याकडेच आता लक्ष आहे. भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन हे एकमेकांविरुद्ध आक्रमक झाले आहेत. दोघे टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यांचा वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला आहे. मात्र आता जळगाव जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी सुरू आहे. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तीन पक्ष महाविकास आघडी म्हणून एकत्र आहेत. मात्र भारतीय जनता पक्ष सोबत येणे गरजेचे आहे. जिल्हा बँकेत खडसे यांचे वर्चस्व आहे. गेल्या वेळी निवडणुका झाल्या त्या वेळी ते भारतीय जनता पक्षात होते. आता ते राष्ट्रवादीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे पक्षाकडून तेच जळगाव जिल्ह्यात निर्णय घेतील. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाजन यांचीही सहमती असणे आवश्यक आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी आता भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची मुंबईत डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, तसेच शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार व जिल्हा बँक संचालक चिमणराव पाटील, भाजप आमदार व जिल्हा बँक संचालक संजय सावकारे, शिवसेना आमदार व जिल्हा बँक उपाध्यक्ष किशोर पाटील यांनी भेट घेतली. भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांचीही भेट घेण्यात येत आहे, त्यासाठी शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. महाजन आता खडसेंसोबत एकत्र येण्यास तयार होणार का, हाच प्रश्‍न आहे. भारतीय जनता पक्ष सहकार क्षेत्रात फारसे लक्ष देत नव्हता, मात्र आता केंद्रात सहकार मंत्रिपद निर्माण केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT