आयटीआय प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
आयटीआय प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ 
मुख्य बातम्या

आयटीआय प्रवेशासाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ; ३१ ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद ः नवीन शैक्षणिक वर्षाकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. आता यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येतील. कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, म्हणून मुदतवाढ देण्याची घोषणा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. आयटीआयसाठी एक ऑगस्टपासून प्रवेश नोंदणी सुरू झाली होती. यापूर्वी १४ ऑगस्ट त्यानंतर २१ ऑगस्ट अशी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु तांत्रिक अडचणी लक्षात घेता कोरोनाच्या काळात कोणीही विद्यार्थी कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; तसेच प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

मोबाईलवरून अर्ज भरण्याची सुविधा दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज करताना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी मोबाईलद्वारे अर्ज करण्याची सुविधा केली आहे. दुर्गम व ग्रामीण भागास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी भेट देऊन लॅपटॉपद्वारे इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेत आहेत. तसेच ज्या भागातून कमी अर्ज प्राप्त झाले आहेत त्या भागात प्रवेश अर्ज भरण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT