The investigating officer of the 'watery' scam has changed 
मुख्य बातम्या

‘जलयुक्त’ घोटाळ्याचा चौकशी अधिकारी बदलला

जलयुक्त शिवार घोटाळ्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी अधिकाऱ्याला बदलण्यात आले आहे. ही चौकशी कायदेशीरदृष्ट्या बळकट होण्यासाठी आता थेट मंत्रालयीन सचिवाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

टीम अॅग्रोवन

पुणे ः जलयुक्त शिवार घोटाळ्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी अधिकाऱ्याला बदलण्यात आले आहे. ही चौकशी कायदेशीरदृष्ट्या बळकट होण्यासाठी आता थेट मंत्रालयीन सचिवाकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.  

‘‘घोटाळ्यातील २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशीची आधीची प्रक्रियाच चुकली आहे. ही चौकशी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम आठ व बारा कलमानुसार करायची होती. मात्र त्यासाठी नियमांचा न करताच चौकशी अधिकारी नियुक्त केला गेला. औरंगाबादच्या प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकाऱ्याला ही जबाबदारी देण्यात आली. आरोप ठेवलेल्या अधिकाऱ्याच्या समान दर्जाचा अधिकारी हा चौकशी अधिकारी म्हणून नेमला जात नाही. मात्र या प्रकरणात ही चूक केली गेली. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया बेकायदा ठरणार होती. त्यामुळे चौकशी अधिकारी बदलण्यात आला,’’ असे कृषी खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती चुकीची असल्याचे सर्वप्रथम कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून देणे अत्यावश्यक होते. मात्र, ही बाब स्वतः चौकशी अधिकाऱ्यानेच ३१ ऑगस्ट २०२१ रोजी एका पत्रान्वये कळवली. त्यामुळे मंत्रालयात धावपळ सुरू झाली. शेवटी आधीचा चौकशी अधिकारी आणि सादरकर्ता अधिकारी बदलण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. त्यासाठी पूर्वीच्या चौकशीचे आदेशही रद्द करावे लागले आहेत. 

‘‘नव्या आदेशानुसार आता मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचा सचिव व विशेष चौकशी अधिकारी २ याला चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच सादरकर्ता अधिकारीदेखील बदलण्यात आला आहे. ही जबाबदारी याच मंत्रालयातील उपसचिवाकडे देण्यात आली आहे. शासनाने ही चूक उशिरा का होईना दुरुस्त केली आहे. त्यामुळे चौकशी कायदेशीरदृष्ट्या भक्कम व जलद होईल,’’ अशी माहिती आस्थापना विभागाच्या सूत्रांनी दिली. 

चौकशी अधिकारी आता जरी मंत्रालयात असले तरी औरंगाबादच्या कृषी सहसंचालकाची भूमिका अद्यापही महत्त्वाची राहील. ‘‘सहसंचालकाला आता या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांच्या चौकशी प्रक्रियेतील संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामुळे सहसंचालकाने वेळेत पुरेशी व अचूक माहिती दिली तरच मंत्रालयातील चौकशीचा गाडा पुढे सरकेल,’’ असेही सूत्रांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, कृषी सहायकांनी या चौकशीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘कृषी आयुक्तालयाच्या मृद्संधारण संचालक कार्यालयातून आदेश निघायचे. कृषी सहसंचालक, एसएओ आणि तालुका कृषी अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार आम्ही कामे करायचो. त्यामुळे मोठे मासे सोडून आमचा बळी दिला जात आहे,’’ असे सहायकांचे म्हणणे आहे. तसेच, ‘‘आम्ही सेवेत असताना घोटाळा दिसला नाही. मात्र, निवृत्तीनंतर आमचा छळ करण्यासाठी वरिष्ठांनी आम्हाला गुंतवले आहे,’’ असा दावा या घोटाळ्यातील निवृत्त कर्मचारी करीतआहेत. 

मंत्रालयातून नेमकी कोणाची चौकशी होणार?

  • रमेश सोपानराव भताने (निवृत्त प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक)
  • महारुद्र नारायणराव पाळवदे (निवृत्त प्रभारी उपविभागीय अधिकारी)
  • हरिराम भानुदास फड (प्रभारी उपविभागीय अधिकारी)
  • शिवजी शंकर हजारे (निवृत्त प्रभारी उपविभागीय अधिकारी)
  • सूर्यकांत शाहूराव आव्हाड (निवृत्त प्रभारी तालुका कृषी अधिकारी)
  • दिलीप शिवाजीराव काळदाते (निवृत्त तालुका कृषी अधिकारी)
  • विजय अर्जुनराव भताने (निवृत्त तालुका कृषी अधिकारी)
  • उल्हास गणपतराव भारती (निवृत्त मंडळ कृषी अधिकारी)
  • प्रकाश दादाराव शिंदे (निवृत्त मंडळ कृषी अधिकारी)
  • अजित अनंतराव गिरी (मंडळ कृषी अधिकारी)
  • नितीन परशुराम शिखरे (प्रभारी कृषी पर्यवेक्षक)
  • सुनील दिनकराव गित्ते (कृषी पर्यवेक्षक)
  • देवानंद बळिराम सांगवे (कृषी पर्यवेक्षक)
  • अमोल मोतीराव कराड (प्रभारी कृषी पर्यवेक्षक)
  • स्वप्नील अनिलराव घोडके (प्रभारी कृषी पर्यवेक्षक)
  • बालाप्रसाद गणपतराव केंद्रे (कृषी सहायक)
  • बापूराव रतन पवार (कृषी सहायक)
  • अरविंद शेषराव सूर्यवंशी (कृषी सहायक)
  • नवनाथ नवहरी नागरगोजे (कृषी सहायक) 
  • पांडुरंग जगन्नाथ जंगमे (कृषी सहायक) 
  • बालाजी अच्च्युतराव चाटे (कृषी सहायक) 
  • संतोष विष्णू तांदळे (कृषी सहायक) 
  • त्र्यिंबक दिगंबरराव नागरगोजे (निवृत्त कृषी सहायक) 
  • प्रल्हाद हरिदास विजापुरे (कृषी सहायक)  
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT