वेंगुर्ले येथे ८ पासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषद
वेंगुर्ले येथे ८ पासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषद 
मुख्य बातम्या

वेंगुर्ले येथे ८ पासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषद

सकाळ वृत्तसेवा

वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर ऍडव्हॉन्मेंट ऑफ ऍग्रिकल्चरल सायन्सेस अँड टेक्‍नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ८ ते ११ मे या कालवधीत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद होत आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची स्थापना १९५७ मध्ये झाली. त्यानंतर येथे आंब्यावर महत्त्वपूर्ण संशोधन झाले. आंबाविषयक महत्त्वपूर्ण संशोधनात्मक योगदानाबद्दल तसेच संशोधन विषयाच्या माहितीचे जागतिक पातळीवर देवाणघेवाण करून बदलत्या वातावरणात शाश्‍वत आंबा उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या संकल्पनेतून प्रथमच जिल्ह्यात अशी परिषद होत आहे. यात देशविदेशांतून १५० हून अधिक कृषी शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत.  या परिषदेदरम्यान विविध विषयांवर तांत्रिक सत्र होतील. मुख्यत्वेकरून जागतिक पातळीवर आंब्याची सद्यःस्थिती, वातावरणातील बदल, आनुवंशिकता आणि प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन, शाश्‍वत उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान, पीक संरक्षण, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषी अर्थशास्त्र, आंबा पिकातील निर्यात इत्यादी विषयांचा समावेश आहे. या निमित्ताने आंबा उत्पादन करणाऱ्या जगभरातील शास्त्रज्ञ, आंबा बागायतदार, आंबा व्यापारी विविध विषयांचे विद्यार्थी यांना आंबा उत्पादनाबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यात आंबा बागायतदार व शास्त्रज्ञ यांचे चर्चासत्र होणार आहे. या वेळी कृषिविषयक प्रदर्शनही होईल. यात २०० हून अधिक आंब्याच्या जाती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. आंब्यामध्ये यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने विविध यंत्र सामग्रीचे प्रात्यक्षिकही होणार आहे. याशिवाय विविध कृषी विषयक प्रशिक्षणे, मत्स्य संवर्धन प्रशिक्षणांचा यात समावेश असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT