Insurance cover for 8,500 hectares of crops in Hingoli district 
मुख्य बातम्या

हिंगोली जिल्ह्यात साडेआठ हजार हेक्टर पिकांसाठी विमा संरक्षण

हिंगोली ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा (२०२०-२१) रब्बी जिल्ह्यातील १५ हजार ३१४ शेतकऱ्यांनी ८ हजार ८८८.२९ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे.

टीम अॅग्रोवन

हिंगोली ः ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा (२०२०-२१) रब्बी जिल्ह्यातील १५ हजार ३१४ शेतकऱ्यांनी ८ हजार ८८८.२९ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले आहे. त्यासाठी ४७ लाख ४८ हजार ४०७ रुपये विमा हप्ता भरला आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व्हि. डी. लोखंडे यांनी दिली.

यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत हरभरा, गहू आदी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १५ हजार ३१४ शेतकरी पीकविमा योजनेत  सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिश्श्याचा ४७ लाख ४८ हजार ४०७ रुपये, राज्य आणि केंद्र शासनाने त्यांच्या हिश्श्याचा प्रत्येकी १ कोटी ६७ लाख १७ हजार ५३४ रुपये असा एकूण ३ कोटी ८१ लाख ८३ हजार ४७७ रुपये  विमा हप्ता भरला आहे. 

खरिपात १ लाख ४७ हजार हेक्टर पिके संरक्षित 

२०२० च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ११ हजार २०९ कर्जदार आणि २ लाख ९१ हजार ४२७ बिगर कर्जदार मिळून एकूण ३ लाख २ हजार ६३६ शेतकऱ्यांनी १ लाख ४७ हजार २३६ हेक्टरवरील पिकांसाठी ६०८ कोटी ४८ लाख ५१ हजार ५५० रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी १३ कोटी १० लाख १ हजार ६१४ रुपये एवढा, तर राज्य आणि केंद्र सरकारने त्यांच्या हिश्श्यांचा प्रत्येकी ४० कोटी ४७ लाख १ हजार ४११ रुपये असा एकूण ९४ कोटी ४ लाख ४ हजार ४३६ रुपये विमा हप्ता भरला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT