Insurance compensation should be given to cotton growers in Akola district 
मुख्य बातम्या

अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना विमा भरपाई द्यावी

जिल्ह्यातही बोटावर मोजण्या इतक्या मंडळात पीकविमा भरपाई दिली असून शासनाने सर्व कापूस उत्पादकांना विमा द्यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव धोत्रे यांनी केली आहे.

टीम अॅग्रोवन

अकोला ः कापूस पिकाची नुकसान भरपाई म्हणून गेल्या हंगामातील पीकविमा पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालाच नाही. जिल्ह्यातही बोटावर मोजण्या इतक्या मंडळात पीकविमा भरपाई दिली असून शासनाने सर्व कापूस उत्पादकांना विमा द्यावा, अशी मागणी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव धोत्रे यांनी केली आहे.

श्री. धोत्रे म्हणाले की, गेल्या वर्षात नुकसान झालेल्या सर्वच जिल्ह्यात कापूस पिकाचा विमा देण्यात आला. मात्र, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांबाबत दुजाभाव करण्यात आला. पातूर तालुक्यात तर कुणालाच विमा मिळाला नाही. संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. शेजारच्या बुलडाणा जिल्ह्यात जवळपास ३२ कोटी रुपये विमा भरपाई तेथील कापूस उत्पादकांना मिळाली आहे. असे असताना अकोला जिल्ह्याबाबत चुकीचे धोरण का घेतले जात आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांत रिमझिम पावसामुळे पिकांचे यंदाही नुकसान केले आहे. हंगामात सुरुवातीला अनेकांना निकृष्ट बियाण्यामुळे सोयाबीनची दुबार-तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला होता. आता कीडरोगांचा प्रादुर्भाव पिकांवर जोर धरत आहे. यावर्षात तणनाशकाची फवारणी करूनही सोयाबीनमधील तणे नष्ट झाली नव्हती. शेतकऱ्यांना निंदणावर अवाढव्य खर्च करावा लागला. अशा आर्थिक संकटाच्या काळात शेतकऱ्याला गेल्या वर्षातील कापूस पिकाचा विमा मिळाला असता तर थोडा दिलासा मिळू शकतो. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत विमा कंपनीने भरपाई द्यावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तूर, हरभऱ्याचे दोन ते अडीच महिन्यांपासून चुकारे थकलेले आहेत. ते तातडीने अदा केले जावेत, अशीही त्यांनी मागणी केली आहे.

डीबीटी धोरण बदलू नये गेल्या शासनाने सुरू केलेले डीबीटी धोरण बदलण्याच्या हालचाली होत आहेत. ही पद्धती चांगली असून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत हव्या असलेल्या सुधारणा कराव्यात मात्र ही पद्धती बदलण्यात येऊ नये. अन्यथा भारतीय किसान संघ या निर्णयाविरुद्ध आंदोलन छेडेल असा इशाराही श्री. धोत्रे यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT