वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना विमा मंजूर
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना विमा मंजूर 
मुख्य बातम्या

वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना विमा मंजूर

टीम अॅग्रोवन

वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान झालेल्या मूग, उडीद या पिकांसाठी कंपनीने विमा मंजूर केला आहे. जिल्ह्यातील १० हजार ६१ शेतकऱ्यांना ८१ लाख ४१ हजार ८८ रुपये विमा मंजूर केला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही विमा मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी सर्वच पिकांच्या नुकसानभरपाईची प्रतीक्षा करीत आहेत. विमा कंपनीकडून मूग, उडीद पिकांसाठी सामुदायिक क्लेम मंजूर करण्यात आला आहे. उंबरठा उत्पन्नाच्या आधारावर ही विमा रक्कम मंजूर  झाली आहे.  जिल्ह्यातील २७ हजारांवर शेतकऱ्यांनी मूग, उडीद पिकांचा विमा काढला होता. यासाठी ४७ लाख ५७ हजार ४४२ रुपये विमा हप्ता भरण्यात आला. विमा कंपनीने सामुदायिक स्तरावर या दोन्ही पिकांसाठी क्लेम मंजूर केला. याचा १० हजार ६१ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी ८१ लाख ४१ हजार रुपये विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केली जात आहे.  उडीद पिकासाठी कारंजा तालुक्यात २०३४, मालेगाव ८६७, मंगरुळपीर ३३८९, मानोरा ७५२ असे एकूण ७०४२ शेतकऱ्यांना तर मूग पिकासाठी कारंजा तालुका १६७९, मालेगाव तालुका १५५, मंगरुळपीर तालुका ११८५ असा एकूण ३०१९ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ दिला जाणार आहे. या दोन्ही पिकांच्या १० हजार ६१ शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT