कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव 
मुख्य बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के क्षेत्रावरील मक्‍यावर अद्यापही लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यात सुमारे २८०० हेक्‍टर क्षेत्रावर विविध कालावधीतील मक्‍याचे पीक आहे. गेल्या महिन्यात अळीचे प्रमाण चाळीस टक्क्‍यांपर्यंत गेले होते. आता औषध फवारणीमुळे त्यात घट होऊन हे प्रमाण पंधरा टक्क्‍यांपर्यंत आले आहे. 

जिल्ह्यात केवळ मका पीक घेण्यापेक्षा उसामध्ये आंतरपीक म्हणून मक्‍याचे पीक घेतले जाते. मक्‍याचे उत्पन्न घेण्यापेक्षा चारा पीक म्हणूनच याचा वापर केला जातो. खरिपामध्ये उसाच्या क्षेत्रात मक्‍याची लागवड अनेक शेतकरी करतात. जून मध्ये ज्या वेळी लागवड झाली. त्या वेळी सुमारे पाच ते दहा टक्क्‍यांवर लष्करी अळी आढळून येत होती. या वेळी मका संशोधन प्रकल्पाच्या वतीने विविध जनजागृतीपर मेळावे घेण्यात आले होते. यानंतर कृषी विभाग व संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आले. इतक्‍या उपाययोजना करूनही अनेक शेतकऱ्यांनी वेळेत फवारणी न केल्याने अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला. 

मध्यंतरीच्या काळात पश्‍चिम भागात अतिवृष्टी व पूर्व भागात महापुराने उसाबरोबर मका पिकाचेही नुकसान झाले. ज्या भागात मका पीक सुस्थितीत आहे त्या भागाकडेही पावसामुळे शेतकऱ्यांनी फवारणीकडे दुर्लक्ष केल्याने या अळीच्या निर्मूलनाकडे दुर्लक्ष झाले. आता बहुतांशी ठिकाणी मक्‍याची उंची पाच ते सह फूट वाढल्याने मक्‍यावर औषध फवारणी करणे अशक्‍य झाले आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत औषधांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

अशास्त्रीय उपाय टाळावेत मका संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. सुनील कराडे यांनी सांगितले की, अनेक शेतकरी अशास्त्रीय उपाय करत असल्याने अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. वाशिंग पावडरच्या द्रावणाचा वापर करून शेतकरी अळीचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या द्रावणामुळे तात्पुरत्या स्वरुपात अळी निद्रीस्त होते. परंतु काही कालावधीनंतर पुन्हा ती सक्रिय होते. हे द्रावण मक्‍यावर टाकल्याने मक्‍याची प्रत खराब होत असल्याने अशा प्रकारचे उपाय शेतकऱ्यांनी करू नयेत, असे आवाहन आम्ही करीत आहोत.

मी उसामध्ये मक्‍याचे पीक घेतो. मक्‍याचे पीक एक महिन्याचे झाल्यानंतर ही अळी दिसण्यास प्रारंभ झाला. परंतु पावसामुळे फवारणी करणे शक्‍य झाले नाही. आता अळी तीस ते पस्तीस टक्क्‍यांवर आहे. यावर फवारणी करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. - प्रकाश पाटील, सांगरुळ, जि. कोल्हापूर 

मी प्रामुख्याने चाऱ्यासाठी मका करतो. यंदा मका उगवणीनंतर थोड्या थोड्या प्रमाणात अळी दिसण्यास प्रारंभ झाला. मी औषधांची फवारणी केली. यातून काही प्रमाणात नियंत्रण झाले. आता आणखी फवारण्या घेण्याबाबत नियोजन करत आहे. मक्‍याची उंची वाढली असली तरी त्यातूनही फवारणी घेणार आहे.  - देवाप्पा पुजारी, तमदलगे, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT