अल्प भूधारक शेतकऱ्याच्या मुलीला दहा पदके !
अल्प भूधारक शेतकऱ्याच्या मुलीला दहा पदके ! 
मुख्य बातम्या

अल्प भूधारक शेतकऱ्याच्या मुलीला दहा पदके !

टीम अॅग्रोवन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची पाच सुवर्णपदके मिळवण्याची असामान्य कामगिरी अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या ३२ व्या दीक्षान्त सोहळ्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव या खेड्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने सर्वाधिक पाच सुवर्ण पदकांसह एकूण दहा पदके मिळवण्याची असामान्य कामगिरी केली.  बीएसस्सी कृषी पदवी परीक्षेत इंद्रायणी मुरलीधर गोमासे या विद्यार्थिनीने ही नेत्रदीपक कामगिरी केली. इंद्रायणीचे नाव घोषीत होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अादिवासी बहुल तालुका म्हणून संग्रामपूरची अोळख अाहे. या तालुक्यातील तामगाव येथील मुरलीधर गोमासे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने अाई-वडिलांचे नाव झळकवले अाहे.  इंद्रायणी हिने जळगाव जामोद येथील कृषी महाविद्यालयात बीएसस्सी कृषीची पदवी घेतली. ही पदवी पूर्ण करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या विदर्भातील सर्व महाविद्यालयांमधून या पदवी परीक्षेत सर्वाधिक गुणांक प्राप्त केले. तसेच किटकशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, कृषीविद्या या विषयात सर्वाधिक मूल्यांक मिळवले. या कामगिरीसाठी तिला पाच सुवर्ण, दोन रौप्य, तीन रोख अशी सर्वाधिक दहा पदके मिळाली.  मुरलीधर गोमासे यांना तीन मुली व एक मुलगा अाहे. इंद्रायणी ही सर्वात मोठी असून तिने कृषी शिक्षणात नेत्रदीपक कामगिरी केली. तिच्या या गौरव सोहळ्याला, दीक्षान्त समारंभाला सोमवारी (ता. पाच) तिचे अाईवडील उपस्थित होते.  कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पद्मभूषण तथा नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर, उमेशचंद्र सारंगी, डाॅ. व्ही. एम. भाले यांच्या हस्ते इंद्रायणीचा गौरव होत असताना तिच्या शेतकरी अाई-वडिलांच्या डोळ्याच्या कडा अानंदाश्रूने पाणावल्या होत्या. संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट करून तिच्या या यशाला सलाम केला. सोहळ्यानंतरही विविध मान्यवरांनी इंद्रायणीची भेट घेऊन कौतुक केले.  मुरलीधर गोमासे यांच्याकडे तीन एकर शेती असून पूर्वी बागायती असलेली ही शेती अाता पाण्याअभावी कोरडवाहू झाली. अशाही परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत त्यांनी तीन मुली व मुलाचे शिक्षण सुरू ठेवले अाहे. एक मुलगी कृषी पदवीधर, दुसरी इंजिनिअर तर मुलगाही इंजिनिअर होत अाहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT