Increase in demand for Khilar bulls 
मुख्य बातम्या

खिलार बैलांच्या मागणीत वाढ

पुणे ः बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर खिलार बैलांच्या मागणीत वाढ झाली आहे. दर देखील वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुधनाचे बाजार देखील जातिवंत खिलार बैलांनी फुलले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चाकण (ता. खेड) आणि बेल्हे (ता. जुन्नर) या प्रसिद्ध पशुधनाच्या बाजारांचा समावेश आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे ः बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर खिलार बैलांच्या मागणीत वाढ झाली आहे. दर देखील वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पशुधनाचे बाजार देखील जातिवंत खिलार बैलांनी फुलले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चाकण (ता. खेड) आणि बेल्हे (ता. जुन्नर) या प्रसिद्ध पशुधनाच्या बाजारांचा समावेश आहे.

चाकण (ता. खेड) येथे दर शनिवारी, तर बेल्हे (ता. जुन्नर) येथे दर सोमवारी जनावरांचा बाजार भरतो. बेल्हे बाजारात मुरबाड, ठाणे, नाशिक, मालेगाव, सटाणा आदी विविध ठिकाणांहून व्यापारी बैल खरेदी - विक्रीच्या निमित्ताने येत असतात. नुकत्याच सोमवारच्या (ता.२०) आठवडे बैल बाजारात खिलार जातीच्या बैलांना गाडा शौकीन मंडळींकडून मागणी राहिली. खिलार जातीच्या बैलांच्या जोडीची किंमत ४० हजार रुपयांपासून ते सुमारे एक लाख रुपयांपर्यंत (प्रति बैलजोडी) आहे. बाजारात खिलार जातीचे बैल पाहण्यासाठी बैलगाडा शौकिनांनी गर्दी केली. 

चाकणच्या शनिवारच्या आठवडे बाजारात देखील खिलार बैलांची आवक आणि मागणी वाढली. दरदेखील वाढले. अनेक वर्षांपासूनची बैलगाडा शर्यतबंदी आणि गेल्या दोन वर्षांतील कोरोनाच्या साथीमुळे जनावरांचे बाजार बंद होते. आता पशुधनाचे बाजार सुरळीत सुरू झाल्याने आणि बैलगाडा शर्यती सुरू झाल्या. त्यामुळे वीस-तीस हजारांवर आलेल्या बैलांच्या किमती पुन्हा अगदी ५० हजारांपासून एक लाख रुपयापर्यंत पोहोचल्या आहेत. 

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्याने राज्यातील प्रसिद्ध चाकण बाजारात खिलार बैलांची सोलापूर, कर्नाटक येथून आवक वाढणार आहे.  बैलांच्या किमती वाढल्या आहेत.  - विनायक घुमटकर, सभापती, खेड बाजार समिती.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमुक्तीसाठी कोणते शेतकरी पात्र?; पुनर्गठित कर्जाबाबतही महत्त्वाचा निर्णय

Tembhu Irrigation Scheme: ‘टेंभूचे उन्हाळी आवर्तन बंद; ६० ठिकाणचे शेतकरी पाण्याविना

Seed Drill Machine: पेरणी यंत्र वापरताना चुका टाळा; उगवण आणि उत्पादन वाढवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी

Agrowon Podcast: हरभरा भावात सुधारणा; सोयाबीन टिकून, कापसाला उठाव, कारले स्थिरावले तर तूर दबावातच

Native Cotton Seeds: देशी कापूस वाणांसाठी शेतकरी जाताहेत परराज्यांत

SCROLL FOR NEXT