बियाणे
बियाणे  
मुख्य बातम्या

अकोली जहाँगीर येथे लागवड केलेल्या ‘एचटीबीटी’चा नमुना पॉझिटिव्ह

टीम अॅग्रोवन

अकोला ः तंत्रज्ञान खुले करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने देशात बंदी असलेल्या एचटीबीटी कापूस बियाण्याची जिल्ह्यात ठिकठिकाणी लागवड केली. गेल्या महिन्यात १० जून रोजी अकोली जहाँगीर येथे लागवड केलेले बीटी बियाणे हे एचटी जीन होते, यावर प्रयोग शाळेत शिक्कामोर्तब झाले आहे. कृषीविभागाने तपासणीसाठी नागपूरला पाठविलेल्या बियाण्याचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर कृषी खात्याने पोलिसांना गुन्ह्यामध्ये याचा अंतर्भाव करण्याची विनंतीसुद्धा केल्याची माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलन छेडले आहे. याची सुरवात अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात अकोली जहाँगीर येथील १० जूनच्या आंदोलनाने झाली. या वेळी एचटीबीटी कापूस बियाणे ललीत बहाळे यांच्या शेतात जाहीररीत्या पेरण्यात आले होते. या वेळी कृषीविभाग तसेच गुण नियंत्रण पथकाने बियाण्याचा नमुना गोळा केला होता. हा नमुना चाचणीसाठी नागपूर येथे आयसीएआरच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आला. त्याचा नुकताच अहवाल कृषीविभागाला प्राप्त झाला असून हे बियाण्यात ९२ टक्के एचटी जीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हा अहवाल मिळाल्यानंतर कृषी विभागाने अकोट ग्रामीण पोलिसांना पर्यावरण कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याचे कळविले. बंदी असलेले बियाणे लागवड केल्याप्रकरणी जिल्ह्यात अकोट व हिवरखेड पोलिस ठाण्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. आता हा नमुना पॉझिटिव्ह आल्याने आणखी काय कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT