शेगावातही एचटीबीटी लागवड आंदोलन
शेगावातही एचटीबीटी लागवड आंदोलन 
मुख्य बातम्या

शेगावातही एचटीबीटी लागवड आंदोलन

टीम अॅग्रोवन

वर्धा ः तंत्रज्ञान स्वातंत्र्याची मागणी करीत शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता. २०) शेगाव (कुंड, ता. हिंगणघाट) येथे मधुसूदन हरणे यांच्या शेतात एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्यात आली. शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.  शेतकरी संघटनेच्या वतीने एचटीबीटी बियाणे लागवडीला परवानगी मिळावी, यासाठी अकोला जिल्ह्यातील अकोली जहाँगीर येथे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या विविध भागांत एचटीबीटी लागवड केली जात आहे. त्याच आंदोलनाचा भाग म्हणून गुरुवारी (ता. २०) हिंगणघाट तालुक्‍यातील शेगाव कुंड येथे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मधुसूदन हरणे यांच्या शेतात एचटीबीटीची लागवड करण्यात आली. संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप, शेतकरी नेत्या सरोजताई काशीकर, मुख्य प्रवक्‍ते ललित बहाळे, राम नेवले, शेतकरी युवा आघाडी अध्यक्ष मधुकर झोटींग, मदन कामडी, नंदकिशोर काळे, शैलजा देशपांडे, सतीश दाणी, सुधीरबाबू कोठारी यांच्यासह विदर्भातील एक हजारांवर शेतकरी उपस्थित होते.  सरकारने पर्यावरण कायदा, जीवनाश्‍यक वस्तू कायदा याची भीती दाखवीत शेतकऱ्यांना तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचा डाव रचला आहे. परंतु, माझ्या शेतात मी काय लावावे, हा निर्णय पूर्णतः संबंधित शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे मी माझ्या शेतात त्याच अधिकारांचा वापर करीत एचटीबीटी लावल्याची माहिती मधुसूदन हरणे यांनी प्रास्ताविकातून दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT