Heavy rainfall in the dam area of ​​Pune district
Heavy rainfall in the dam area of ​​Pune district 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर

टीम अॅग्रोवन

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता. यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणातून कमीअधिक पाण्याचा कऱ्हा, नीरा, मुळा, मुठा, इंद्रायणी, घोड नदीत विसर्ग सोडण्यात आला होता.

जिल्ह्यात बुधवारी (ता. १४) सायंकाळी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटक बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, हवेली या तालुक्यांसह इतर तालुक्याला बसला आहे. भात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यासोबत ऊस, सोयाबीन, भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे या पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला चांगलाच फटका बसला आहे. पिकांसह नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सोडल्याने ९२५ कुटुंबांतील तीन हजार नागरिकांना स्थलांतरित केले आहे. पुणे जिल्ह्यातील तीन व्यक्तींचा मृत्यू तर एक व्यक्ती बेपत्ता झाला आहे. तर १३ घरांची पडझड झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूत्रांनी दिली.

गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसभर पावसाची काही प्रमाणात उघडीप दिली असली तरी धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. अनेक भागात ढगाळ हवामान असून पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतीकामे खोळंबली आहे. भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पाऊस झाला असून जवळपास २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १७ मिलिमीटर तर कळमोडी १६ मिलिमीटर पाऊस पडला. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून नुकसानीची परिस्थिती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.

शुक्रवारी (ता. १६) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः पिंपळगाव जोगे ६, येडगाव २, वडज ३, डिंभे १२, घोड २, विसापूर २, कळमोडी १६, चासकमान ५, भामा आसखेड १२, वडिवळे १०, आंध्रा ११, पवना ९, कासारसाई १५, मुळशी ८, टेमघर ४, वरसगाव १०, पानशेत १०, खडकवासला ९, गुंजवणी ४१, नीरा देवघर १७, भाटघर २३, वीर ३, नाझरे १०, उजनी ३, चिल्हेवाडी ७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT