Hawaman
Hawaman  
मुख्य बातम्या

कोकणात अतिवृष्टीचा इशारा 

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात दाखल झालेला मॉन्सून दोन ते तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सक्रिय होत आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. विदर्भात काही अंशी ऊन असले, तरी पश्‍चिम महाराष्ट्रात अधूनमधून ऊन पडत आहे. उद्यापासून कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत कडाक्याचे ऊन पडले होते. त्यामुळे उकाड्यात वाढ होऊन कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भात पुन्हा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत होता. मात्र मंगळवारी हा पारा कमी होऊन सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली होती. अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया या भागांत तापमानात चांगलीच घट झाली आहे. बुधवारी (ता. ९) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील अकोला येथे ३८.९  अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. 

कोकणात बुधवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा वाढल्याने कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कोकण विभागात असलेल्या मुंबईत सर्वांत कमी २८.२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, मध्य महाराष्ट्रात २१ ते ३८, मराठवाड्यात ३४ ते ३६ तर विदर्भात ३४ ते ३८ अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान नोंदविले गेले. 

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस  गुरुवार ः कोकणात मुसळधार, मराठवाड्याचा काही भाग, संपूर्ण विदर्भात मध्यम ते जोरदार  शुक्रवार ः संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ  शुक्रवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ  शनिवार ः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ  बुधवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) 

  • मुंबई (सांताक्रूझ) ३२.१ 
  • अलिबाग - ३० 
  • रत्नागिरी - ३०.५ 
  • डहाणू - ३२.४ 
  • पुणे - ३१.१ 
  • जळगाव - ३८.६ 
  • कोल्हापूर - ३० 
  • महाबळेश्‍वर - २१.७ 
  • मालेगाव - ३४.८ 
  • नाशिक - ३१.८ 
  • सांगली - ३२.२ 
  • सातारा - ३०.५ 
  • सोलापूर - ३६.१ 
  • औरंगाबाद - ३४.१ 
  • परभणी - ३६.५ 
  • बीड - ३६.२ 
  • अकोला - ३८.९ 
  • अमरावती - ३४.८ 
  • बुलडाणा - ३६ 
  • ब्रह्मपुरी - ३७.९ 
  • चंद्रपूर - ३८.२ 
  • गोंदिया - ३७.५ 
  • नागपूर - ३८.८ 
  • वर्धा - ३७.८ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT