काही ठिकाणी आज मुसळधारेचा इशारा 
काही ठिकाणी आज मुसळधारेचा इशारा  
मुख्य बातम्या

काही ठिकाणी आज मुसळधारेचा इशारा 

टीम अॅग्रोवन

पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र, आज (ता.१३) सोलापूर, नांदेड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.  परतीच्या मॉन्सूनचा प्रवास सुरू आहे. त्यातच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. आज आणखी या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ नर्सापूर आणि विशाखापट्टनम व काकीनडा या परिसरात विरून जाण्याची शक्यता आहे.  सोमवारी ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनमपासून ते आग्नेयकडे २८० किलोमीटर, तर काकिनाडापासून आग्नेयकडे ३२० किलोमीटर, नर्सापूरपासून आग्नेयकडे ३६० किलोमीटर अंतरावर होते. आज त्या क्षेत्राची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम मध्य अरबी समुद्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थितीअसून ती आंध्र प्रदेश, रायलसिमा व उत्तर कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान सरकत आहे.  गुरूवारी या वाऱ्यांची स्थिती कोकण, दक्षिण गुजरात या भागात येऊन कमी होण्याची शक्यता आहे. तर उत्तर कर्नाटकाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला राज्यातून माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. राज्यात होत असलेल्या तुरळक ठिकाणी पाऊस पडत असल्याने हवेत गारवा तयार होत आहे. त्यामुळे किमान तापमानात चढउतार होत असून साताऱ्यातील महाबळेश्वर येथे १७.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले.

येथे पडणार जोरदार पाऊस मंगळवारी ः सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ. बुधवारी ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे,   अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा.  गुरूवारी ः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, नागपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT