मराठवाड्यातील दमदार पाऊस गायब, तुरळक हजेरी
मराठवाड्यातील दमदार पाऊस गायब, तुरळक हजेरी 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात पावसाची तुरळक हजेरी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत शनिवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत केवळ ६३ मंडळांत तुरळक पाऊस झाला. याशिवाय उर्वरित मंडळांकडे पावसाने पाठ फिरविली. शनिवारी सकाळी सूर्यदर्शन झाले. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता यामुळे वाढली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी ३६ मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. २ ते १३ मिलिमिटर दरम्यान पावसाची नोंद या मंडळांमध्ये झाली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी केवळ भोकरदन व बदनापूर तालुक्‍यांतील दोन मंडळांत तुरळक पाऊस झाला. बीड जिल्ह्यात तर पावसाने घोर निराशा केली आहे. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी केवळ पुर्णा तालुक्‍यातील दोन मंडळांत तुरळक पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातील ५३ पैकी निलंगा तालुक्‍यातील एका मंडळांत पडलेला २ मिलिमीटरवगळता उर्वरित मंडळांकडे पावसाने पाठ फिरविली. उस्मानाबाद जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. वाशी, उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्‍यांतील सात मंडळांत तुरळक पाऊस झाला. याशिवाय पावसाने जिल्ह्यात निराशा केल्याचे चित्र पहायला मिळाले. नांदेड जिल्ह्यातील ८० पैकी १५ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी केवळ २ मंडळांत पावसाची तुरळक सर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ढगांअभावी मेघ बीजारोपण राहिले

मराठवाड्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे आकाशात दिसणाऱ्या मात्र न बरसणाऱ्या ढगांवर प्रयोग करण्याच्या चाचणीची शुक्रवारी (ता.९) सुरवात करण्यात आली. त्यासाठी आवश्‍यक फ्लेअर्स घेऊन विमानाने आकाशात झेपही घेतली. परंतु आवश्‍यक ढगच न मिळाल्याने कुठेही मेघ बीजारोपन न करता विमान परत आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT