संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस

टीम अॅग्रोवन

सातारा  ः जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील महाबळेश्वर, पाटण, जावली, सातारा, वाई या तालुक्‍यांत पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात सोमवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर तालुक्‍यात पावसाचा सर्वाधिक जोर असून, या तालुक्‍यात ८०.५ मिमी पाऊस झाला आहे. तसेच, जावली व पाटण तालुक्‍यांतही दमदार पाऊस सुरू आहे. सातारा, कराड, वाई, कोरेगाव व खटाव या तालुक्‍यांत पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत आहे.

सोमवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. दुष्काळी फलटण, माण, खंडाळा या तालुक्‍यांत शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाच्या दमदार सरी कोसळत आहे. या धरण क्षेत्रातील कोयना येथे ९२, नवजा येथे ७३, महाबळेश्वर येथे ८६ मिमी पाऊस झाला असून, सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत धरणात साठ्यात १.९४ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण ४३.७० टीएमसी म्हणजेच ४१.५२ टक्के साठा होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT