राधानगरी धरणातून सुरु असलेला विसर्ग
राधानगरी धरणातून सुरु असलेला विसर्ग 
मुख्य बातम्या

कोल्हापुरातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने आता बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे महापुराचा धसका घेतलेल्या नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

मंगळवारी (ता. ४) सकाळपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू होता. त्या तुलनेत पूर्व भागात हवामान ढगाळ राहिले. बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी २२ फूट दहा इंच इतकी होती. सकाळी सहा ते दुपारी बारा या कालावधीत नदीच्या पाण्याच्या पातळीत दोन इंचांनी वाढ झाली. दुपारी बारा वाजेपर्यंत एकूण बारा बंधारे पाण्याखाली गेले.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे दुपारी बारा वाजता आठ फुटांनी उचलले होते. यातून तब्बल ७३ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने धरणाच्या सांडव्यातून ५२०० क्युसेक, तर पॉवर हाउसमधून ९०० असा एकूण ६१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यातून ४२५६ क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. तुळशी धरणातून एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात होता. वारणा धरणातून ३६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू होता.

जिल्ह्यातील धरणक्षेत्र वगळता अन्यत्र पावसाची रिमझिम राहिली. दिवसभर ढगाळ हवामान असल्याने थांबून थांबून पावसाच्या सरी सुरू होत्या. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी २२ मिमी पावसाची नोंद झाली. गगनबावडा येथे सर्वाधिक ८४ मिमी पावसाची नोंद झाली.

पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे ६ बंधारे पाण्याखाली आहे. भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे हे ३ बंधारे पाण्याखाली आहे. वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव हे २ बंधारे पाण्याखाली आहे. दूधगंगा नदीवरील दत्तवाड हा बंधारा पाण्याखाली आहे. सध्या बहुतांशी धरणे पूर्ण भरली आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणांतून तातडीने पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT