पुणे जिल्ह्यात जोर'धार' कायम
पुणे जिल्ह्यात जोर'धार' कायम 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात जोर'धार' कायम

टीम अॅग्रोवन

पुणे : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील तालुके, घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर‘धार’ कायम आहे. गेले काही दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसाने धरणे फुल्ल झाली असून, मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कुकडी, भीमा, घोड, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा, निरा आणि कानंदी या नद्यांना पूर आले आहेत. पश्चिम भागात काही दिवस सूर्य दर्शन झाले नाही. तर अनेक भागांत ऊन सावल्यांच्या खेळात श्रावण सरी अनुभवायला मिळत आहेत. 

जिल्ह्यातील धरणे ओव्हर फ्लो झाल्याने येडगाव, डिंभे, चासकमान, भामा असखेड, वडीवळे, आंद्रा, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, गुंजवणी आणि वीर आदी धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे, नाझरे धरण वगळता उर्वरित सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

डिंभे धरणातून १० हजार, चासकमान धरणातून ११ हजार, खडकवासला धरणातून २७ हजार, मुळशी धरणातून सुमारे २० हजार, तर वीर धरणातून २२ हजार, पानशेत धरणातून १० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अनेक उपनद्या दुथडी भरून वाहत असल्याने भीमा नदीला पूर आला आहे. भीमेतून होणाऱ्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून, लवकर धरणाची उपयुक्त पातळी ५० टक्क्यांवर जाणार आहे.  

धरण क्षेत्रातील पाऊस (मिमी) 

टेमघर १७८, वरसगाव ११६, पानशेत १२२, खडकवासला ३०, पवना ११५, कासारसाई ३४, मुळशी १५३, कळमोडी २८, भामा आसखेड ३६, आंद्रा ४६, वडीवळे १०५, गुंजवणी ८२, नीरा देवघर ९३, येडगाव २०, वडज २८, डिंभे २४.

मंडळनिहाय पाऊस 

जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी (ता. ३) जिल्ह्यात मंडळ निहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : महसूल विभाग) : पौड ९६, घोटावडे १७०, माले १५३, मुठा १७८, पिरंगुट १००, भोलावडे १६५, आंबवडे ५६, निगुडघर ९३, वडगाव काळे ११५, कार्ला १९२, खडकाळा ८८, लोणावळा २६६, वेल्हा १३४, पानशेत १२२, विंझर ६७, जुन्नर ४३, राजूर ५९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT