बीड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
बीड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी Agrowon
मुख्य बातम्या

बीड जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

टीम अॅग्रोवन

बीड : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, सोमवारी (ता. ४) रात्री तसेच मंगळवारी (ता. ५) सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३ मिमी इतका पाऊस झाला. अंबाजोगाई व या तालुक्यातील लोखंडी सावरगाव व माजलगाव या तीन महसुली मंडलांत अतिवृष्टी झाली. वडवणी व शिरूर हे दोन तालुके वगळता नऊ तालुक्यांत पाऊस झाला. पैकी पाच तालुक्यांत सर्वदूर पाऊस झाला.

पावसाच्या या आगमनाने बळिराजा सुखावला आहे. काही ठिकाणी नुकसानही झाले. जिल्ह्यात विशेषतः माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यांत सोमवारी मध्यरात्री जोरदार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. याशिवाय काही भागांत पावसाने हलकी हजेरीही लावली होती. यानंतर सोमवारी रात्री व पुन्हा मंगळवारी पहाटेपासून सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यात एकूण १४३.४ मिमी, तर सरासरी १३ मिमी इतका पाऊस झाला. खरिपाच्या पेरण्यांचा हा काळ असल्याने पावसामुळे शेतकरी सुखावला असून, शेतकऱ्यांना आता खरीप पेरण्यांचे वेध लागले आहेत. अद्यापही एखाद्या जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून, आगामी काळात जोरदार पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना प्रारंभ करण्याचा मानस शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गतवर्षी बोंड अळीने दगा दिल्यामुळे उत्पादनात अर्ध्यापेक्षा अधिक घट झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षीच्या खरिपाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर माजलगाव आणि बीड येथील हमीभाव खरेदी केंद्रावरील हरभरा व तूर भिजून नुकसान झाले.

तीन महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद माजलगाव महसूल मंडलात ७० मिमी, अंबाजोगाई महसूल मंडलात ७० मिमी, तर लोखंडी सावरगाव मंडलात ७७ मिमीची नोंद झाली आहे. याशिवाय दिंद्रूड मंडलात ६३ मिमी, परळी मंडलात ४२ मिमी, गंगामसला मंडलात ४० मिमी, तर तेलगाव मंडलात ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६३ महसूल मंडल असून, यापैकी ४३ मंडलांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसामुळे काही भागांत शेतीमध्ये पाणी साचले असून, छोटे नाले व ओढेही वाहू लागले आहेत.

पाच तालुक्यांत सर्वदूर पाऊस दरम्यान, सोमवार रात्री ते मंगळवार सकाळपर्यंत पाटोदा, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव आणि केज या तालुक्यांत सर्वदूर पाऊस झाला. इतर चार तालुक्यांतही पावसाने हजेरी लावली.

Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT