विदर्भात आज उष्णतेची लाट; शुक्रवारपासून राज्यात अवकाळीचा अंदाज 
मुख्य बातम्या

विदर्भात आज उष्णतेची लाट; शुक्रवारपासून राज्यात अवकाळीचा अंदाज

मराठवाडा ते कोमोरीन परिसर आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, मंगळवारपासून (ता. ६) विदर्भात काही प्रमाणात उष्णतेची लाट आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा 

पुणे : मराठवाडा ते कोमोरीन परिसर आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, मंगळवारपासून (ता. ६) विदर्भात काही प्रमाणात उष्णतेची लाट आहे. आजही विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  दोन दिवसांपासून अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तर तेलंगाणा ते तमिळनाडूच्या उत्तर -दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, तमिळनाडूच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. यामुळे उन्हाचा चटका वाढून उकाड्यात वाढ होत आहे.  मंगळवारी (ता. ६) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.वाढत्या तापमानामुळे कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी तापमानात मोठी तफावत आढळून येत असून, नागपूर येथे १९.३ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. राज्यातील बहुतांश ठिकाणचा गारठा कमी झाला आहे. पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने पारा ४० अंश सेल्सिअसवर सरकला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज आणि उद्या वातावरणात आणखी वेगाने बदल होण्याची शक्यता आहे.  येथे होणार अवकाळी पाऊस : शुक्रवार - भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ शनिवार - कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ  मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विविध शहरांतील कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये ः

  • शहर --- कमाल तापमान
  • मुंबई (सांताक्रूझ)---३२.७
  • अलिबाग---३१.३
  • रत्नागिरी---३३.२
  • डहाणू---३२.३ 
  • पुणे---३९.६
  • जळगाव---४१.३
  • कोल्हापूर---३९.३ 
  • महाबळेश्‍वर---३२.६
  • मालेगाव---४०.८ 
  • नाशिक---३७.९
  • सांगली---३९.९
  • सातारा---३९.२
  • सोलापूर---४१.७ 
  • औरंगाबाद---४०.१ 
  • परभणी---४०.३
  • नांदेड---४१.५
  • अकोला---४२.५
  • अमरावती---४१.४
  • बुलडाणा---३९.५
  • ब्रम्हपुरी---४३.५ 
  • गोंदिया---४०.२
  • नागपूर---४१
  • वर्धा---४१.१ 
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

    Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

    Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

    Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

    Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

    SCROLL FOR NEXT