Temperatures can fluctuate
Temperatures can fluctuate 
मुख्य बातम्या

राज्यात तापमानात चढ-उतार शक्य

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी होऊन, चटका आणि उकाडा वाढला आहे. कोकणात तापमान ३६ अंशांच्या पुढे गेले असून, बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वेंगुर्ला येथे देशातील उच्चांकी ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर नागपूर येथे राज्यातील नीचांकी १०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या कमाल, किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मध्य महाराष्ट्रापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या स्थितीमुळे किमान व कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून, राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांच्या, तर किमान तापमान १३ ते २१ अंशांदरम्यान आहे. नगर, रत्नागिरी, सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३६ अंशांपेक्षा अधिक तर जळगाव, सांगली, सोलापूर, अकोला येथे कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. 

बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान (कंसात) तापमान, (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.७ (१५.९), नगर ३६.२ (१५.३), जळगाव ३५.३ (१३.७), कोल्हापूर ३३.१ (२०.२), महाबळेश्‍वर ३०.० (१६.८), मालेगाव ३३.८ (१५.६), नाशिक ३४.१ (१५.०), निफाड ३०.० (११.२), सांगली ३५.४ (१८.७), सातारा ३४.६ (१६.७), सोलापूर ३५.६ (२०.१), अलिबाग ३४.०(२१.३), डहाणू ३१.१ (२१.०), सांताक्रूझ ३६.५ (२०.८), रत्नागिरी ३७.० (२०.७), औरंगाबाद ३३.५(१५.५), परभणी ३४.५ (१३.६), नांदेड (१४.०), अकोला ३५.९ (१३.६), अमरावती ३३.२ (१५.२), बुलडाणा ३१.६ (१४.६), चंद्रपूर ३४.० (१३.०), गोंदिया २९.६ (११.६), नागपूर ३२.३ (१०.१), वर्धा ३३.०(१२.६), यवतमाळ ३३.०(१४.४).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT