Harvesters harvested sugarcane since the labor had not yet arrived
Harvesters harvested sugarcane since the labor had not yet arrived 
मुख्य बातम्या

मजूर अद्याप आले नसल्याने हार्वेस्टरने ऊस तोडणी

टीम अॅग्रोवन

सातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्याचा गाळप सुरू आहे. काही कारखान्यांनी तयार झालेल्या साखरेच्या पोत्यांचे पूजन झाले आहे. करार झालेले सर्व मजूर दाखल झालेले नसल्यामुळे गाळपास आवश्यक गती नसल्याने कारखान्यांनी हार्वेस्टरचा वापर सुरुवातीपासून केला जात आहे. कारखान्यांची संख्या आणि उसाचे घटलेले क्षेत्र यामुळे उसाची टंचाई भासणार आहे.  

जिल्ह्यातील अजिंक्यतारा, सह्याद्री, कृष्णा, रयत, जयवंत शुगर, जरंडेश्वर, माण-खटाव, वर्धन अॅग्रो, शरयु, श्रीराम, किसनवीर, लोकनेते बाळासाहेब देसाई या कारखान्यांचा गळित हंगाम प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील या हंगामात १५ ते १६ कारखान्यांकडून ऊस गाळपाची शक्यता आहे. यातील १२ कारखान्यांकडून गाळपास प्रारंभ झाला आहे. 

जिल्ह्यात गाळपासाठी तीन हंगामाचा मिळून ४३ हजार हेक्टर उसाचे उपलब्ध आहे. हे क्षेत्र गतवर्षाच्या तुलनेत हे क्षेत्र खूपच कमी आहे. त्यातच उपलब्ध क्षेत्रापैकी महापुरामुळे ऊस खराब झाला आहे. यामुळे या हंगामात उसाची टंचाई भासणार असल्याने मिळेल तो ऊस गाळप केला जाणार आहे. क्षेत्राच्या घटीमुळे उसाचा चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक गाळपाची क्षमता सह्याद्री कारखान्यांची असून या कारखान्यांकडून गतवर्षीप्रमाणे सर्वाधिक हंगाम होणार आहे. ऊस तोडणीसाठी करार केलेल्या मजूरांकडून अनेक टॅक्ट्रर मालक शेतकऱ्यांना फसविण्यात आले आहे. उचल घेऊनही मजूर आले नसल्यामुळे टॅक्टर मालक अडचणीत आले आहेत. पैसे अडकण्याबरोबरच व्यवसाय होत नसल्यामुळे टॅक्ट्रर मालक शेतकऱ्यांचा दोन्ही बाजुंनी तोटा सुरू आहे. याप्रकारच्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना टॅक्टर विकावे लागले आहेत. मजूरावर उपाय म्हणून हंगामाच्या सुरुवातीपासून हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे कारखान्यांनी गाळपाची ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे. 

गाळप हंगाम सुरू झाला असला तरी पहिल्या उचलीबाबत अजून शांतता आहे. अवकाळी पावसामुळे हंगामाचा कालावधी पुढे गेला असल्याने शेतकऱ्यांकडून ऊस लवकरात लवकर तुटावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी केली आहे. यावर कारखान्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे उसाच्या दराचे कोणते सूत्र स्वीकारणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मंजूरी टंचाईवर हार्वेस्टरचा पर्याय जिल्ह्यात कारखान्याच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे उसतोड मजुराची टंचाई वाढली आहे. यावर उपाय म्हणून साखर कारखान्यांनी हंगामाच्या सुरुवातीपासून उस तोडणीसाठी हार्वेस्टरचा वापर सुरू केला आहे. हार्वेस्टरमुळे वेळेची बचत होत असल्यामुळे गाळपाची उद्दिष्टे पूर्ण करणे सोपे होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT