कापूस
कापूस 
मुख्य बातम्या

गुजरातमध्ये कापसाला ५०० रुपये बोनस

कोजेन्सिस वृत्तसेवा

मुंबई : हंगामात बंपर उत्पादनाचा अंदाज असल्याने बाजारात कापसाचे दर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कापसाला किमान आधारभूत किमतीच्या वर प्रतिक्विंटल ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला आहे, अशी माहिती गुजरात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.   ‘‘राज्यातील कापूस उत्पादकांकडून खरेदी केलेल्या कापसाला किमान आधारभूत किमतीवर २० किलोसाठी १०० रुपये बोनस देण्याचा निर्णय राज्य सरकारने रविवारी (ता. २२) घेतला,’’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.   गुजरातमध्ये सर्वाधिक उत्पादित होणाऱ्या मध्यम आणि लांब धाग्याच्या कापसासाठी यंदा केंद्राने प्रतिक्विंटल ४२७० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना आता बोनससह ४७७० रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार आहे. राज्यातील हजर कापूस बाजार दिवाळीत बंद झाला. बाजार बंद झाला त्या वेळी कमी प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल ४७५० ते ५००० रुपयांंपर्यंत दर मिळाला. हा दर हमीभावापेक्षा अधिक आहे.  

राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राबरोबर राज्यभरात जवळपास ५६ खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. यातील ४० खरेदी केंद्रे १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. गुजरात हे महाराष्ट्र आणि तेलंगणानंतर तिसरे महत्त्वाचे कापूस उत्पादक राज्य आहे. गुजरात सरकराने २०१७-१८ च्या हंगामात ७.३६ दशलक्ष गाठी कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. जास्त उत्पादनामुळे आतापर्यंत तरी कापसाच्या दरात जास्त चढ-उतार पाहायला मिळाला नाही. एकदा बाजारात कापसाची आवक वाढली, की दर हमीभावापर्यंत खाली येतील अशी आम्हाला आशा आहे. -  एन. एम. शर्मा,  कार्यकारी संचालक, गुजरात राज्य सहकारी कापूस महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

SCROLL FOR NEXT