rice crop  
मुख्य बातम्या

चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५ एकरवर सामुहीक शेती

चांदोली धरणग्रस्तामधील नांदोली वसाहत, हादरेवाडी, शेंडेवाडी तीनही वसाहतील सत्तर उंबरा आहे. यामधील बहुतेक लोक शेतीवर गुजराण करतात. परंतू धरणात शेती गेली.

टीम अॅग्रोवन

मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील नांदोली वसाहत, हादरेवाडी, शेंडेवाडी तीनही वसाहतील सत्तर उंबरा आहे. यामधील बहुतेक लोक शेतीवर गुजराण करतात. परंतू धरणात शेती गेली. त्यामुळे शेती करण्याची इच्छा असून करता येत नाही. परंतू मांगले गावात आम्ही २५ एकर क्षेत्र कराराने भात पिकवण्यास घेतले आणि आमचे शेती करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, अ असा आनंद शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. शिराळा तालुका भात पिकवणारा असा प्रसिध्द आहे. कालांतराने चांदोली धरणाच्या निर्मिती नंतर वारणा नदी बारमाही वाहू लागली. अर्थात चांदोली धरण बांधताना अनेक कुटूंबाना दुसऱ्या गावात विस्थापित करण्यात आले. मांगले (ता. शिराळा) या गावात नांदोली वसाहत, हादरेवाडी, शेंडेवाडी ही विस्थापित गावे आहेत. या तीनही वसाहतीत मिळून ७० घरे असून लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे. गेल्या दोन चार वर्षांपासून विस्थापित चांदोली धरणग्रस्त खंडाने शेती कसण्यासाठी घेवू लागले आहेत. आता सामुहिक रित्या कसण्यासाठी शेतकरी शेती खंडाने घेत आहेत.  चांदोली विस्थापित धरणग्रस्तांच्याकडे शेती कसण्यासाठी बाहेरील मजुरांशिवाय घरातील लोकांची मदत, कष्ट करण्याची तयारी, यामुळे त्यांनी आपली स्वःताची शेती बघत खंडाच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवून संबधित शेतकऱ्याला वर्षभर पुरेल एवढे भाताचे उत्पन्न मिळवून देत आहेत. या वसाहतीतील विस्थापित धरणग्रस्त खंडाने शेती करताना आपल्या शेतीतही ऊसाचे चांगले उत्पन्न घेत आहेत. कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द यामुळे आपले मूळ गाव सोडल्यानंतर विस्थापित होवून राहायला घरे मिळेपर्यंत भटके जीवन जगणारे विस्थापित धरणग्रस्त आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रतिक्रिया वसाहतीतील इतर लोकांची समुहाने मशागत करण्याची तयारी आहे. यामुळे आम्हाला भात शेती करणे सोपे वाटते. यावर्षी आम्ही तीनही वसाहतीतील मिळून वीस लोकांनी २५ एकराच्यावर खंडाने शेती केली आहे. यामधून चांगले उत्पन्न काढून आम्हालाही आणि शेतकऱ्यालाही फायदा करून देत आहोत .  - दगडू लाखन, शेतकरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT