Ground water level in Nanded district increased by 1.26 meters
Ground water level in Nanded district increased by 1.26 meters 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६ मीटरने वाढ

टीम अॅग्रोवन

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये सरासरी १.२६ मीटरने वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात घेतलेल्या निरीक्षण नोंदीवरून हे आढळून आले आहे, अशी माहिती वरिष्ठ भू-वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सूत्रांनी दिली.

जानेवारी महिन्यातील भूजलपातळीच्या नोंदी घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यांतील एकूण १३२ निरीक्षण विहिरीतील पाणी पातळीचे मोजमाप घेण्यात आले. जिल्ह्याची सरासरी स्थिर भूजल पातळी ७.८९ मीटर आहे.

यंदाच्या जानेवारी महिन्यातील भूजल पातळी सरासरी ६.६३ मीटर आहे. मागील पाच वर्षातील जानेवारी महिन्यातील भूजल पातळीची तुलना केली असता यंदाच्या जानेवारीतील भूजल पातळीत सरासरी १.२६ मीटरने वाढ झाल्याचे आढळून आले. 

जून ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. विशेषतः सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सिंचन विहिरी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी, मोठे, मध्यम, लघू प्रकल्पाची जलाशये यांच्यातील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता कमी राहू शकते. परंतु, पाणी टंचाई स्थिती टाळण्यासाठी भूगर्भातील पाण्याच्या बेसुमार उपशावर बंधन घालणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनीदेखील उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी प्रवाही पाणी पद्धत बंद करून ठिबक आणि तुषार आदी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT