नांदेड विभागात गाळप हंगाम अंतिम टप्प्यात Grinding in Nanded division In the final stages of the season 
मुख्य बातम्या

नांदेड विभागात गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील गाळप हंगाम अंतिम टप्यात आला आहे. विभागात सुरू झालेल्या २५ पैकी १५ साखर कारखाने बंद झाले आहेत.

टीम अॅग्रोवन

नांदेड : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील गाळप हंगाम अंतिम टप्यात आला आहे. विभागात सुरू झालेल्या २५ पैकी १५ साखर कारखाने बंद झाले आहेत. या कारखान्यांनी मार्चअखेर ९२ लाख टन उसाचे गाळप झाले तर ९२ लाख २८ हजार क्विंटल साखरचे उत्पादन झाल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १७ खासगी तर नऊ सहकारी साखर करण्याचा समावेश होता. आजपर्यंत २५ कारखान्यांनीच गाळप सुरू केले आहे. यात १० सहकारी तर १५ खासगी कारखान्याचा समावेश होता. या २५ कारखान्यांनी मार्च अखेर ९२ लाख ५६ हजार ६८४ टन उसाचे गाळप केले आहे. तर ९२ लाख २८ हजार ६८५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ असल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्राने दिली. दरम्यान सध्या हंगाम अंतिम टप्यात आला आहे. विभागातील २५ पैकी १५ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. ऊस संपत आल्यामुळे इतर १० कारखानेही लवकरच बंद होतील, अशी शक्यता आहे.

गाळप, उताऱ्यात बळिराजा साखर अव्वल नांदेड विभागात सर्वाधिक गाळप व साखर उताऱ्यात परभणी जिल्ह्यातील बळिराजा साखर कारखाना कानडखेड (ता. पूर्णा) हा खासगी कारखाना अव्वल ठरला आहे. या कारखान्याने मार्चअखेर ६ लाख ४५ हजार ३४५ टन उसाचे गाळप करत सात लाख ३० हजार आठशे क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर या कारखान्याचा साखर उतारा ११.३२ टक्के आला आहे. हा उतारा विभागात सर्वाधिक आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT