ग्रामपंचायत संगणकचालक वेतनाअभावी अडचणीत
ग्रामपंचायत संगणकचालक वेतनाअभावी अडचणीत 
मुख्य बातम्या

ग्रामपंचायत संगणकचालक वेतनाअभावी अडचणीत

टीम अॅग्रोवन

अकोला : काम करूनही महिनोमहिने मानधन मिळत नसल्याने जिल्ह्यात ग्रामपंचायतींमध्ये परिचालक म्हणून काम करीत असलेले कर्मचारी अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता थकीत मानधन व इतर मागण्यांसंदर्भात अकोला जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  याबाबत अधिक माहिती अशी, जिल्ह्यातील काही संगणक परिचालकांचे माहे डिसेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०१७ पर्यंत सीएसपीव्ही या कंपनीला शासनाने पैसे देऊनसुद्धा मानधन दिले गेलेले नाही. जिल्ह्यात काही ठिकाणी मानधान झाले; परंतु दोनशे, पाचशे, हजार, दीड हजार अशा स्वरूपात मानधन देण्यात आले. शासनाच्या परिपत्रकानुसार संगणकचालकाला ६००० रुपये मासिक मानधान देणे गरजेचे आहे. असे असूनसुद्धा कंपनी त्यामध्ये कपात करीत आहे. कंपनीला प्रत्येक ग्रामपांचायत केंद्रामधून दरमहा १२४०० रुपये कपात केली जाते. परंतु संगणकचालकाला ते मानधन ६ ते ७ महिने विलंबाने दिले जाते. प्रत्येक ग्रामपंचायतीमधून कॉम्प्युटर, प्रिन्टर दुरुस्तीसाठी व टोनर आणि कागद रिमकरिता ग्रामंपचायतीमार्फत कंपनीला निधी पाठविला जातो, परंतु डिसेंबर २०१७ पासून एकाही ग्रामपंचायतीचे कॉम्प्युटर स्पेअर पार्ट किंवा दुरस्ती अजूनसुद्धा करून दिले गेले नसल्याचा आरोप या संगणकचालकांच्या संघटनेने केला आहे. कंपनीकडून पैसे गोळा करण्याचे काम सुरू आहे. गाव पातळीवर सर्व सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सरपंच, ग्रामसेवक व ऑपरेटर यांची संयुक्त कार्यशाळा घेण्याची शासनाने ही जबाबदारी कंपनीला दिली होती. परंतु तालुका स्तरावर आजपर्यंत एकही प्रशिक्षण झाले नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शासन निर्णयानुसार सेवा केंद्रामध्ये वीज व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. परंतु जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये ती सुविधा अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नसल्याची बाबही मांडली. संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास गुरुवार (ता. ८) पासून काम बंद आदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष अविनाश मातळे व उपाध्यक्ष अतुल आबुलकर यांनी दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : तीन जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यातील काही भागात वादळी पावसाचा अंदाज

Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Non-Basmati White Rice Exports : भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; पाठवला जाणार १४००० टन बिगर-बासमती पांढरा तांदूळ

Index of Seasonal Migration : हंगामी बाह्य स्थलांतराचा निर्देशांक

SCROLL FOR NEXT