dada bhuse
dada bhuse  
मुख्य बातम्या

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री दादा भुसे

टीम अॅग्रोवन

कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य शासनाने महसूल यंत्रणेस दिले आहेत. त्या प्रमाणे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत देईल, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (ता. 26) कन्नड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत सांगितले.  

कृषिमंत्री भुसे यांनी नागद (ता. कन्नड) येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्या. मंत्री भुसे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभे आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी विमा कंपनीशी संपर्क साधावा. कन्नड तालुक्यातील कोविड सेंटरविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. 

या पत्रकार परिषदेस आ. उदयसिंग राजपूत, शिवसेना तालुका प्रमुख केतन काजे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, तहसीलदार संजय वारकड, विभागीय कृषी अधिकारी प्रभाकर चव्हाण, गटविकास अधिकारी कृष्णा वेणीकर, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.लांजेवार, पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, यांच्यासह डॉ. आण्णासाहेब शिंदे, शहरप्रमुख सुनील पवार, कपूरचंद राठोड, अतिक शेख, अरुण राठोड, प्रकाश पातळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. 

कृषिमंत्री श्री.भुसे यांनी नागद व कन्नड येथे कार्यकर्ते व नागरिकांचा सत्कार स्वीकारला नाही. सध्या शेतकऱ्यांवर संकट ओढवले असून, त्यांच्यावर आलेल्या संकटाची आपण पाहणी करत आहोत,अशा प्रसंगी फुले, हार, सत्कार स्वीकारणे योग्य नाही, असे सांगून त्यांनी सत्कार घेतला नाही.  नियोजित मार्ग बदलला  मंत्री श्री.भुसे यांचा मालेगावहुन चाळीसगाव मार्गे औरंगाबाद असा नियोजित दौरा होता. मात्र आमदार उदयसिंग राजपूत यांनी, कन्नड तालुक्यातील पिके अति पावसाने हातची गेली असून पाहणी करण्यासाठी नगद मार्गे जाण्याची विनंती केली. श्री.भुसे यांनी आपला नियोजित मार्ग बदलून कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT