Gokul packing will be changed to prevent adulteration 
मुख्य बातम्या

भेसळ रोखण्यासाठी गोकूळ पॅकिंग बदलणार

पुणे : दुधामध्ये होणारी भेसळ रोखून ग्राहकांपर्यंत उत्तम दर्जाचे आणि शुद्ध दूध पोचविण्यासाठी आता ''गोकूळ''चे दूध अधिक सुरक्षित पॅकिंगमध्ये देण्याचा निर्णय गोकूळ दूध संघाने घेतला आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : दुधामध्ये होणारी भेसळ रोखून ग्राहकांपर्यंत उत्तम दर्जाचे आणि शुद्ध दूध पोचविण्यासाठी आता ''गोकूळ''चे दूध अधिक सुरक्षित पॅकिंगमध्ये देण्याचा निर्णय गोकूळ दूध संघाने घेतला आहे. या नव्या पॅकिंगचं वैशिष्ट्य म्हणजे दुधात भेसळ करण्याचा प्रयत्न झाला असेल, तर ते पॅकिंगवरून ग्राहकांना सहज लक्षात येऊ शकणार आहे. मात्र ग्राहकांना भेसळमुक्त दूध देण्यासाठी ''गोकूळ''ने पॅकिंग बदलली तरी दुधाच्या विक्री दर ‘जैसे थे’ राहणार आहेत.

गोकूळचे दूध आतापर्यंत पॉलिपिक पिशवीतून वितरित होत असे. ही पिशवी तीन पडद्याची असे. त्यामुळे त्यात भेसळ करणे शक्य होत होते. पण आता त्यात बदल करून आता ते पाच पडद्याच्या पिशवीतून ग्राहकांपर्यंत पोचविले जाणार आहे. यामुळे एकदा दूध पॅक झालं की, त्यात भेसळ करणं अशक्य होईल. तरीही कोणी तसा प्रयत्न केला, तरी वैशिष्ट्यपूर्ण पॅकिंगमुळे ग्राहकांनाच ते सहज लक्षात येऊ शकेल. 

गोकूळ या नावाची विश्वासार्हता खूप मोठी आहे. गोकूळने दूध वितरण सुरू केलं, तेव्हापासून आतापर्यंत ग्राहकांना दर्जेदार दूध उत्पादन देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. याच प्रयत्नांतूनच ग्राहकांना भेसळमुक्त दूध देण्यासाठी ''गोकूळ''चे पॅकिंग अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय घेतल्याचे या दूध संघाचे संचालक विश्‍वास पाटील यांनी सांगितले.

भेसळ अशी ओळखावी 

‘‘गोकूळ दूध संघाकडून फुलक्रिम दुधासाठी सीआय या अत्याधुनिक छपाई तंत्रज्ञानाची पाच पडद्याची सिक्युरिटी फिल्म वापरली जात आहे. अधिक सुरक्षितता म्हणून या फिल्मवर बारीक अक्षरात छपाई करून आतील भागात निळ्या रंगाच्या फिल्मचा थर दिला आहे. त्यामुळे जर कुणी भेसळ करण्याचा प्रयत्न केला, तर सील केलेल्या जागी काळसर ठिपका दिसेल. पर्यायाने ग्राहकांना दुधातील भेसळ ओळखता येईल’’, असे पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT