कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष विश्वास पाटील.
कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष विश्वास पाटील. 
मुख्य बातम्या

पाऊण तासात गुंडाळली ‘गोकुळ’ची वार्षिक सभा

Raj Chougule

कोल्हापूर : कोणत्याही विषयावर चर्चा न होता अवघ्या पाऊण तासाच्या आत जिल्ह्याचे आर्थिक सत्ताकेंद्र असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उप्तादक संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १५) गुंडाळण्यात आली.

संघाचे संचालक नसलेले माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी अवघ्या दहा मिनिटांच्या भाषणात संघाच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर सर्वांना अहवाल मिळाला का, असे विचारत मंजूरची वाट न पाहता थेट राष्ट्रगीतास सुरवात केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले. या कृतीचा धिक्कार करीत सतेज पाटील गटाच्या सभासदांनी प्रवेशद्वारारावर जोरदार घोषणाबाजी केली.

बाहेर समांतर सभा घेत या अनिष्ठ पायंड्याचा निषेध करत ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप सभासदांनी केला. गोकुळ दूध संघात ५० कोटींचा संशयास्पद व्यवहार असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर  सर्वसाधारण सभा गाजण्याची चिन्हे होती. त्यामुळेच पोलिसांनी सकाळपासूनच गोकुळ दूध संघाच्या मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढविला होता.

सकाळी अकरा वाजता सभेस सुरवात झाली. अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी प्रास्ताविक केल्यानंतर इतर संचालकांची थोडक्‍यात भाषणे झाली; पण सभा गुंडाळण्याच्या नादात असणाऱ्या संचालकांनी फार तपशिलात न जाता भाषणे आटोपती घेतली. ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्यासह सर्व संचालक या वेळी उपस्थित होते. सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सभा गुंडाळण्याच्या विरोधात घोषणा दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT