The glory of the bird forest, nurture it - Aranyarishi Maruti Chitampally 
मुख्य बातम्या

पक्षी वनांचे वैभव, त्याचे संवर्धन करा : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली

‘‘पक्षी वनांचे वैभव आहे. पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकांनी याकामी आपले योगदान द्यावे,’’ असे आवाहन अरण्यऋषी साहित्यिक तथा सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनी गुरुवारी (ता.५) येथे केले.

टीम अॅग्रोवन

सोलापूर  : ‘‘पक्षी वनांचे वैभव आहे. पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकांनी याकामी आपले योगदान द्यावे,’’ असे आवाहन अरण्यऋषी साहित्यिक तथा सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनी गुरुवारी (ता.५) येथे केले.

 सिद्धेश्वर वनविहार येथे अरण्यऋषी कक्षात चितमपल्ली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी चितमपल्ली बोलत होते. मुख्य वनसंरक्षक सुजय डोडल, वनसंरक्षक (वन्यजीव) रमेश कुमार, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक के. एल. साबळे, बाबा हाके, चेतन नलावडे, संध्याराणी बंडगर, सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे, डॉ. सुहास पुजारी आदी उपस्थित होते.

वन विभागामार्फत पक्ष्यांचे निसर्गातील महत्त्व नागरिकांना कळावे, पक्ष्यांबाबत जाणीव वाढीस लागावी, यासाठी गुरुवार (ता. ५) नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत पक्षी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अरण्यऋषी चितमपल्ली यांचा वाढदिवस आणि जागतिक किर्तीचे पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य सरकारने हा पक्षी सप्ताह जाहीर केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT