Giving food to those in need and never ration card holders : Raut
Giving food to those in need and never ration card holders : Raut 
मुख्य बातम्या

शिधापत्रिका नसलेल्या गरजूंना धान्य द्या : ऊर्जामंत्री डॉ. राऊत

टीम अॅग्रोवन

मुंबई : ‘कोरोना’च्या लॉकडाऊन काळात शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. 

सद्यस्थितीत शिधापत्रिका नसलेल्या अनेक गरजू कुटुंबियांना अन्न-धान्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. राज्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अनेक उपाययोजना करत आहे. ‘कोरोना’मुळे दुर्बल घटकातील नागरिकांवर अन्नाविना राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी राज्य सरकारने नुकतेच रेशन दुकानात माफक दरात तीन महिने धान्य देण्याची घोषणा केली. त्याच अनुषंगाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या दारिद्रय रेषेवरील व केशरी शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य रास्तभाव दुकानातून धान्य पुरवठा करावा. त्याचप्रमाणे काही कागदोपत्री पुरावे देता न आलेल्या शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना अन्न-धान्य द्यावे, यासाठी शासनस्तरावर तात्काळ धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती डॉ. राऊत यांनी केली. 

झोपडपट्टीत राहणारे दुर्बल घटक, शेतमजूर, सायकल रिक्षा, ऑटो चालक, चहाची टपरी, पानठेला चालवणारे, बुटपॉलिश करणारे, विट भट्टी कामगार आदी दररोज काम करून आपले उदरनिर्वाह करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हजारो कामगार कुटुंबियांकडे शिधापत्रिका उपलब्ध नाहीत. म्हणून त्यांना सवलतीच्या दरात व मोफत धान्य वितरण करता येत नाही. ते अन्नधान्य सुरक्षेपासून वंचित आहेत. त्यांना आधार देण्यासाठी आमदार निधीतून तात्काळ किमान २५ लक्ष निधी वापरण्याची परवानगी द्यावी, अशी डॉ. राऊत यांची मागणी आहे. 

या व्यतिरिक्त लॉकडाऊन कालावधीत केबल टीव्ही चालकांनी ग्राहकांकडून मासिक शुल्क, केबल चार्जेस एक महिना विलंबाने वसूल करावे, कोणतेही केबल कनेक्शन खंडीत करू नये, जेणेकरून जनतेला दिलासा मिळेल, अशी सूचनाही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Panchayat Development : पंचायत विकासाची नोंदणी

SCROLL FOR NEXT