Ginger crop in Satara district An estimated 40 percent decline 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात आले पीक ४० टक्के घटण्याचा अंदाज

सातारा ः गेल्या तीन वर्षांपासून आले पिकांच्या दरातील घसरण शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे. आले पिकास मिळत असलेल्या दर हा न परवडणारा आहे. त्यामुळे या हंगामात आले पिकांच्या क्षेत्रावर परिणाम होणार आहे. ३० ते ४० टक्के आले पिकांचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.

टीम अॅग्रोवन

सातारा ः गेल्या तीन वर्षांपासून आले पिकांच्या दरातील घसरण शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे. आले पिकास मिळत असलेल्या दर हा न परवडणारा आहे. त्यामुळे या हंगामात आले पिकांच्या क्षेत्रावर परिणाम होणार आहे. ३० ते ४० टक्के आले पिकांचे क्षेत्र कमी होण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात आले पिकांचे सुमारे तीन ते साडे तीन हजार हेक्टर क्षेत्र आहे. सातारा, कोरेगाव, कऱ्हाड, खटाव या तालुक्यात सर्वाधिक आले पीक घेतले जाते. कोरोना येण्यापूर्वी आले पिकांचे दर प्रतिगाडी (५०० किलो) १५ ते २० हजारापर्यंत होते. लॅाकडाऊनमुळे आले. पिकांच्या दरात मोठी घसरण झाली. १५ ते २० हजारांवरून प्रतिगाडीस पाच ते सहा हजार रुपयांवर दर आले आहेत. हेच दर मागील दोन वर्षांपासून मिळत आहे. तरीही दर वाढेल या अपेक्षावर शेतकऱ्यांनी आले पिकांची लागवड केली. याही हंगमात दरात सुधारणा होत नसल्यामुळे आले उत्पादक चिंतेत आहेत. सध्या आले पिकास प्रतिगाडीस पाच ते सहा हजार रुपये दर आहे. 

वातावरणातील सतत होत असलेल्या बदलांमुळे आले पिकांस कंदकुज झाल्याने भांडवली खर्चात मोठी वाढ झाली आहे. आले लागवड करण्याकडे कल कमी होऊ लागला आहे. बियाणे खरेदीबाबत शेतकऱ्यांमध्ये फारशी उत्सुकता दिसून येत नाही. परिणामी, या हंगामात मोठ्या प्रमाणात आले पिकांच्या क्षेत्रात घट होणार आहे. 

सोयाबीन सारखे तिमाही पिकांचे जेवढे पैसे शिल्लक राहतात, तेवढे वर्षभर आले करून पैसे राहात नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. तज्ज्ञ शेतकऱ्यांच्या मते आले पिकांच्या क्षेत्रात ३० ते ४० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. आले पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT