Future of 4,229 candidates in Nashik district closed in ballot box
Future of 4,229 candidates in Nashik district closed in ballot box 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील ४,२२९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५ ग्रामपंचायतींसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६८.८७ टक्के मतदान झाले. ४  हजार २२९ सदस्यांच्या निवडीसाठी ११ हजार ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १२ लाख ८४ हजार मतदारांनी या उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद केले. ५५ ग्रामपंचायतीमध्ये १ हजार ६२२ जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे उर्वरित ४ हजार २२९ जागांसाठी मतदान झाले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या निवडणुकीनंतर कार्यक्रम जाहीर झाला. ही निवडणूक सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्ह्यात ९ हजार ७६० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. काही तुरळक ठिकाणी गोंधळ वगळता निवडणुका शांततेत पार पडल्या. 

पानेवाडी (ता.नांदगाव) ग्रामपंचायतीत मतपत्रिकेवर तीन उमेदवारांपैकी एकाचे नाव न आल्यामुळे खळबळ उडाली होती. सायगाव (ता.येवला) येथे वॉर्ड क्रमांक १ मध्ये ३७५ मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला. एक तास मतदान प्रक्रिया थांबली होती. यानंतर तंत्रज्ञ आल्यानंतर दुसरे संपूर्ण नवीन मशिन जोडल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली.

येसगाव (ता.मालेगाव) येथेही असाच प्रकार घडला. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रित करण्यात अपयश आल्याचे पाहायला मिळाले. 

अतिसंवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त 

जिल्ह्यात एकूण ५ हजार ८९५ पैकी   १ हजार ६२२ उमेदवार बिनविरोध झाले. त्यामुळे ४ हजार २२९ जागांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीसाठी प्रशासनाने ६१ बस, ४०२ जीप आणि १२६ मिनी बस अधिग्रहीत केल्या होत्या. जिल्ह्यात ४४ संवेदनशील, तर आठ अतिसंवेदनशील केंद्रांवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT