फळपीक विमा
फळपीक विमा 
मुख्य बातम्या

आंबिया बहरासाठी फळपीक विमा लागू

sandeep navale

पुणे ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे. प्रतिकूल हवामान घटकांपासून द्राक्ष, संत्री, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, काजू, पेरू व लिंबू अशा फळपिकांना या योजनेतून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या सूत्रांनी केले. पाऊस, वादळ, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या धोक्‍यांपासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक साहाय्य देणे तसेच फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आंबिया बहरात द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, काजू, पेरू व लिंबू या फळपिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम शेतकऱ्यांना भरावयाची आहे. योजनेत सहभागी जिल्हानिहाय कंपन्या  इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड - वाशीम, वर्धा, जालना, पुणे, रत्नागिरी, लातूर व अकोला. ए चडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी - ठाणे, कोल्हापूर, परभणी, यवतमाळ, नाशिक, हिंगोली, रायगड, धुळे, नागपूर, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबाद, नंदुरबार. बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी - बुलडाणा, औरंगाबाद, नगर, अमरावती, पालघर, सांगली, नांदेड, बीड. योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत बॅंकांना अर्ज सादर करण्याची मुदत पीक --- अंतिम मुदत द्राक्ष -- १५ आॅक्‍टोबर डाळिंब, मोसंबी, पेरू, केळी -- ३१ आॅक्‍टोबर संत्रा, काजू -- ३० नोव्हेंबर आंबा --- ३१ डिसेंबर लिंबू --- १४ नोव्हेंबर बॅंकांनी घोषणापत्र विमा कंपनीस सादर करण्याची मुदत पीक -- अंतिम मुदत द्राक्ष -- ७ नोव्हेंबर डाळिंब, मोसबी, पेरू, केळी -- २० नोव्हेंबर संत्रा, काजू -- २० डिसेंबर आंबा, लिंबू -- ४ डिसेंबर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत पीक -- अंतिम मुदत द्राक्ष -- १५ आॅक्‍टोबर डाळिंब, मोसंबी, पेरू, केळी -- ३१ आॅक्‍टोबर संत्रा, काजू -- ३० नोव्हेंबर आंबा -- ३१ डिसेंबर लिंबू -- १४ नोव्हेंबर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी घोषणापत्रे देण्याची अंतिम मुदत पीक -- अंतिम मुदत द्राक्ष -- २६ आॅक्‍टोबर डाळिंब, मोंसबी, पेरू, केळी -- ९ नोव्हेंबर संत्रा, काजू -- ११ डिसेंबर आंबा -- ८ जानेवारी लिंबू -- २२ नोव्हेंबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT