चार जिल्ह्यात उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच कर्जवाटप
चार जिल्ह्यात उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच कर्जवाटप 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच कर्जवाटप

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांत २ जूनअखरेपर्यंत प्राप्त उद्दिष्टाच्या केवळ ५.४५ टक्‍केच खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी कर्जपुरवठ्यासंदर्भात बॅंका उद्दिष्टपूर्ती बॅंका करतील का, हा प्रश्न असून मुख्यंमत्र्यांनी बॅंकांना दिलेली सूचना कागदावरच राहते की काय अशी अवस्था आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांना येत्या खरीप हंगामासाठी ४८३२ कोटी ५३ लाख ६० हजार रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, व्यापारी बॅंका व ग्रामीण बॅंक शाखांनी या उद्दिष्टाची पूर्ती करणे अपेक्षित आहे. येत्या वर्षात खरीप व रब्बीसाठी पतपुरवठा करताना जिल्हा सहकारी बॅंकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शासनाने राष्ट्रीयीकृत बॅंकांवर कर्जवाटपाचा अधिकचा बोजा टाकला आहे. परंतु प्रत्यक्षात कर्जवाटपात या बॅंका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असल्याचे चित्र चारही जिल्ह्यांत पाहायला मिळते आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली व या चारही जिल्ह्यांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी २ जूनपर्यंत प्राप्त उद्दिष्टाची ८.५४ टक्‍केच पूर्ती केली. दुसरीकडे ग्रामीण बॅंकेने प्राप्त उद्दिष्टाच्या १४.६१ टक्‍के कर्जपुरवठा केला. तर व्यापारी बॅंकांनी केवळ ३.०३ टक्‍के उद्दिष्टपूर्ती केल्याचे चित्र आहे.

५१ हजार २२६ शेतकऱ्यांनाच मिळाले कर्ज औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांतील केवळ ५१ हजार २२६ शेतकऱ्यांनाच आजवर २६३ कोटी ५६ लाख १६  हजार रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले. यामध्ये चारही जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी कर्जपुरवठा केलेल्या ३१ हजार १६४, व्यापारी बॅंकांनी कर्जपुरवठा केलेल्या ९४४८ तर ग्रामीण बॅंकांनी कर्जपुरवठा केलेल्या १० हजार ६१४ शेतकरी सभासदांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ हमीदराने शेतीमाल खरेदीत शासन दावे करीत असले तरी प्रत्यक्षात लाइनवरच नसलेल्या ऑनलाइनच्या जंजाळात अडकण्यापेक्षा गरज ओळखून शेतकऱ्यांना आपला उत्पादित माल हमीदरापेक्षा कमी दराने विकण्याशिवाय पर्याय उरला नाही. मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदीच होणे बाकी असताना खरेदी बंद झाल्याने खरिपासाठी पैशाची सोय करणारा हरभरा शेतकऱ्यांना विकता आला नाही. दुसरीकडे विकलेल्या तुरीचे चुकारेही मोठ्या प्रमाणात थकलेले आहेत. अशा स्थितीत कर्जाच्या पुरवठ्याशिवाय शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीची सोय लावणे शक्‍य होईल, असे चित्र नाही. त्यामुळे पतपुरवठ्याअभावी शेतकरी अडचणीत येण्याची शक्‍यताच जास्त आहे.

जिल्हानिहाय कर्ज मिळालेल्या शेतकरी सभासदांची संख्या औरंगाबाद    २०५९७ जालना    २२९१९ परभणी    ५६२५ हिंगोली    २०८५ जिल्हानिहाय कर्जपुरवठा औरंगाबाद    १२५ कोटी २९ लाख ९९ हजार जालना        ९१ कोटी ५० लाख ०४ हजार परभणी         ३५ कोटी ११ लाख ४१ हजार हिंगोली        ११ कोटी ६४ लाख ७२ हजार

चार जिल्ह्यांत बॅंकनिहाय उद्दिष्ट व पूर्ती
बॅंक  उद्दीष्ट   पूर्तता
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ८०० कोटी ६४ लाख ४२ हजा ६८ कोटी ३७ लाख ८३ हजार
व्यापारी बॅंक ३४०१ कोटी ५८ लाख ७१ हजार १०३ कोटी ०८ लाख २६ हजार
ग्रामीण बॅंक ६३० कोटी ३० लाख ४७ हजार ९२ कोटी १० लाख ०७ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT