forest 
मुख्य बातम्या

गडचिरोलीत घटले जंगल क्षेत्र

गेल्या आठ वर्षात राज्यात सर्वाधिक जंगलाचा भूभाग असणाऱ्या गडचिरोलीत तब्बल १७७.०६ चौरस किलोमीटर जंगल घटल्याचा धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

टीम अॅग्रोवन

गडचिरोली ः जल, जंगल आणि जमीन संरक्षणासाठी शासनाकडून भर दिला जात आहे. असे असताना गेल्या आठ वर्षात राज्यात सर्वाधिक जंगलाचा भूभाग असणाऱ्या गडचिरोलीत तब्बल १७७.०६ चौरस किलोमीटर जंगल घटल्याचा धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.  भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या वतीने दर दोन वर्षांनी इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशित केला जातो. २०१९ या वर्षातील अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात कमी होणाऱ्या जंगल क्षेत्राचे वास्तव मांडण्यात आले आहे. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्टच्या अहवालानुसार २०१७ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० हजार चार चौरस किलोमीटरचे जंगल होते. २०१९ मध्ये ९ हजार ९१६ चौरसमीटर जंगल शिल्लक राहिले आहे. त्यावरुन जंगलक्षेत्रात मोठ्या प्रमाणात तोड झाल्याचे स्पष्ट होते.  जंगल तोड अशीच होत राहिल्यास गडचिरोलीचा जंगलासाठीचा लौकिक कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ८० ते १०० वर्ष वय झालेली जवळपास पचा हजार हेक्‍टरवरील झाडे दरवर्षी तोडली जातात. त्या ठिकाणी नव्या रोपांची लागवड केली जाते. राज्य शासनाच्या वृक्ष लागवड योजनेत २०१६ ते २०१९ या चार वर्षाच्या कालावधीत १५ हजार हेक्‍टरवर वृक्ष लागवड करण्यात आल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. ही झाडे लहान असल्याने ती सॅटेलाईच्या नजरेत येत नाहीत, असा दावाही करण्यात आला आहे.  गडचिरोलीत धोक्याची घंटा गडचिरोली जिल्ह्याचा एकूण विस्तार १४ हजार ४१२ चौरस किलोमीटर आहे. २०११ च्या अहवालात १० हजार ९४ चौरस किलोमीटरचे जंगलक्षेत्र दाखविण्यात आले आहे. एकूण भूभागाच्या टक्‍केवारीत हे प्रमाण ७०.०४ इतके होते. २०१९ मध्ये जंगल क्षेत्र ९,९१६ चौरस किलोमीटर राहिले असून ही टक्‍केवारी ६८.८१ इतकी आहे. ही या भविष्यासाठी धोक्‍याची घंटा मानली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT