कोल्हापूरसाठी पाच फिरते  पशुवैद्यकीय दवाखाने Five rounds for Kolhapur Veterinary dispensaries
कोल्हापूरसाठी पाच फिरते  पशुवैद्यकीय दवाखाने Five rounds for Kolhapur Veterinary dispensaries 
मुख्य बातम्या

कोल्हापूरसाठी पाच फिरते पशुवैद्यकीय दवाखाने 

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पाच गाड्या जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. शिराळ, हातकणंगले, करवीर, पन्हाळा, कागल या तालुक्यांसाठी या गाड्या शासनाकडून मिळाल्या आहेत. 

ज्या जनावरांची मेडिकल इमर्जन्सी आहे, त्यांनी पुणे मुख्यालयात कॉल केल्यास तो कॉल संबंधित जिल्ह्याला जाईल. जिल्हास्तरावर कॉलबाबत खात्री करून घेतली जाईल. खातरजमा झाल्यानंतर आजाराची गंभीरता पाहिली जाईल. त्या नंतर फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे पथक खास जनावरांसाठी तयार केलेल्या वाहिकेतून थेट तुमच्या गावी दाखल होईल. या गाडीत फ्रिजसह ऑपरेशन थिएटरही सज्ज असेल. आजारांच्या गांभीर्यानुसार तुमच्या गोठ्यात येऊन तातडीने उपचार सुरू करण्यात येतील. ज्या भागात पशुवैद्यकीय सेवा नाहीत, त्या भागासाठी ही सेवा पशुपालकांसाठी वरदान ठरणार आहे. शासनाने प्रत्येक गाडीसाठी ४१ हजार रुपयांची तरतूद केली आहे. यामध्ये चालक, इंधन मानधनासहित इतर खर्चाचा समावेश आहे. 

पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत या गाड्या दाखल झाल्या आहेत. डोंगरी तालुक्यासाठी त्यांची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळे या तालुक्यांना या गाड्या मिळाव्यात, अशी आम्ही शासनाकडे मागणी करीत असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. एच. पठाण यांनी सांगितले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते चावी देऊन लोकार्पण करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए. पठाण, सहाय्यक आयुक्त डॉ. विनोद पवार उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT