कृषिकन्या पहिल्या प्रयत्नातच फौजदार
कृषिकन्या पहिल्या प्रयत्नातच फौजदार 
मुख्य बातम्या

कृषिकन्या पहिल्या प्रयत्नातच फौजदार

टीम अॅग्रोवन

नाशिक  : देवळा तालुक्यात खुंटेवाडी येथे रावण दौलत पगार यांची अडीच एकर कोरडवाहू शेती. चांगला उत्पन्नाचा मार्ग नसल्याने ते इतरांकडे वाट्याने शेती करतात. पत्नी, एक मुलगा अन दोन मुली असं त्यांचं कुटुंब. आपल्या हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी मुलांचे शिक्षण केले. याचीच जाणीव ठेवत त्यांची थोरली मुलगी योगिता हिने शिक्षण घेतले. तिच्या जिद्दीने स्वतःला सिद्ध केले आहे. योिगताची नुकतीच पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली.

सटाणा येथील महाविद्यालयातून २०१६ साली बीएस्सीची पदवी मिळवली. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण घेणे अवघड होते. अशा वेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा तिने संकल्प केला. स्वत:वरील विश्वास, अपार कष्टाची तयारी आणि आई-वडिलांची साथ यामुळे तिने हे यश संपादित केले.

योगिताने दहावीपर्यंतचे शिक्षण जनता विद्यालय पिंपळगाव (वा) येथे घेतले. त्यासाठी तिला रोज ४ किलोमीटरची पायपीट करावी लागत होती.

योगिता म्हणाली, ‘‘कोणत्याही खासगी क्लासची गरजच भासली नाही. दररोज किमान दोन तास वृत्तपत्र वाचन, इयत्ता ५ वी ते १२ वीच्या सायन्स, इतिहास व भूगोलाचे वाचन केले. यासह प्रत्येक विषयाच्या स्वतंत्र नोट्स काढल्याचा फायदा झाला.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT