वीज जोडणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न
वीज जोडणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न 
मुख्य बातम्या

वीजजोडणीसाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

टीम अॅग्रोवन

नगर : पैसे भरल्यानंतर वारंवार मागणी करूनही वीजजोडणीसाठी सहा वर्षांपासून विद्युत खांब टाकले जात नसल्याचा संताप अनावर झाल्याने रांजणी (ता. नगर) येथील शेतकऱ्याने गुरुवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र,  त्याच वेळी घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी व पत्रकारांनी संबंधित शेतकऱ्यास रोखल्याने अनर्थ टळला. सखाराम लक्ष्मण ठोंबे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रांजणी (ता. नगर) येथे ठोंबे यांची चार एकर शेती आहे. तेथे नवीन वीज जोडणीसाठी ठोंबे यांनी १० मार्च २०१२ रोजी रीतसर अर्ज करून पैसेही भरले. मात्र, अजूनही त्यांना महावितरणकडून रीतसर वीजजोडणी मिळालेली नाही. शेजारील शेतकरी त्यांच्या शेतात विजेचे खांब रोवण्यासाठी प्रतिबंध करीत आहेत, तसेच त्यांनी रस्ताही अडविल्याची ठोंबे यांची तक्रार आहे. त्या संदर्भात ठोंबे यांनी पाच मार्चला महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता व सहा मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आत्मदहन आंदोलनाची कल्पना दिली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करण्यात आल्याने ठोंबे यांनी आज सकाळी साडेअकराच्या सुमारास आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर सोबत आणलेल्या ड्रममधील रॉकेल अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच वेळी तेथे उपस्थित पोलिस कॉन्स्टेबल वसीम पठाण व सचिन गोरे, तसेच खासगी कामानिमित्त आलेले प्रेस क्‍लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख व ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे महाराज यांनी तत्काळ शेतकऱ्याच्या हातातून रॉकेलचा ड्रम हिसकावला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शेतकऱ्याच्या खिशात तीन काड्यापेट्या आढळून आल्या. एखादी काडेपेटी निकामी झाल्यास दुसरी कामी येईल, अशी त्यामागे अटकळ होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT