Farmers should brand their produce after processing: Chalavade 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांनी शेतमालाचे प्रक्रियेनंतर ब्रॅंडिंग करावे : चलवदे

शेतकऱ्यांनी शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून शेतीमालावर प्रक्रिया करावी, अशा शेतीमालाचे ब्रँडिंग करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचे नियोजन करावे. यासोबतच स्मार्ट योजनेअंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.

टीम अॅग्रोवन

नांदेड : शेतकऱ्यांनी शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून शेतीमालावर प्रक्रिया करावी, अशा शेतीमालाचे ब्रँडिंग करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचे नियोजन करावे. यासोबतच स्मार्ट योजनेअंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले.

देगलूर येथे कृषी विभागाच्या वतीने जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन मंगळवारी (ता. २२) करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विभागीय विस्तार कृषी विद्यावेत्ता अरुण गुट्टे, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, सगरोळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ सुरेश कुलकर्णी, देगलूर उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. सोनटक्के, देगलूर तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, देगलूर तालुक्यातील कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सोमेश्‍वर गिरी, माधव सोनकांबळे, कृषी सहायक माने, पैलवाड, यन्नावार, पोतदार, कोनगुलवार, हंगीरगेकर, आचमारे, जायभाये यांनी प्रयत्न केले.

रब्बी पिकांची पाहणी प्रक्षेत्र भेटीदरम्यान करडई, धने, ज्वारी, हरभरा या पिकांची पाहणी केली. त्याचबरोबर पेरू, सीताफळ या फळपिकांची तसेच जेरेनियम या सुंगधी वनस्पती शेतीची पाहणी करण्यात आली. यादरम्यान शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. शेततळे व त्यातील मत्स्यपालन याचीही पाहणी करण्यात आली. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे अरुण गुट्टे यांनी पिकांचे कीड व रोग व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Preparation: शेतकऱ्यांनी पर्यायी पिकांचे आतापासूनच नियोजन करा: जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Sindhudurg Water Storage: सिंधुदुर्गातील लघुप्रकल्पांमध्ये केवळ २६.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Sugarcane Crushing: खानदेशात २३ लाख टनांवर ऊस गाळप

Natural Farming: वाशीम जिल्ह्याची नैसर्गिक शेतीकडे वाटचाल

Agriculture Support: शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते उपलब्ध करा: पालकमंत्री संजय शिरसाट

SCROLL FOR NEXT