खरेदी केंद्र
खरेदी केंद्र 
मुख्य बातम्या

हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

सकाळ वृत्तसेवा

औसा, जि. लातूर ः तालुक्‍यात शासनाच्या कृषी व पणन मंडळाच्या सहकार्याने सुरू झालेल्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, खरिपाचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची २४ दिवसांत केवळ २ हजार ८२ क्विंटलची खरेदी झाली आहे. याउलट बाजारपेठेतील आवक मात्र गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट होण्याच्या मार्गावर आहे. गेल्यावर्षी पावसामुळे सोयाबीनचे बम्पर उत्पादन होऊनही ते काळे पडल्याने अतिशय कमी भावात विक्री करावी लागली. यंदाही कमी भावामुळे शेतकरी भरडला जात असल्याने मागणीप्रमाणे उशिरा का होईना शासनाचे हमीभाव केंद्र २४ नोव्हेंबरपासून सुरू झाले; परंतु २४ दिवस उलटूनही शेतकऱ्यांचा ओढा या केंद्राकडे दिसत नाही. यात एक तर हे केंद्र खूप उशिराने सुरू झाले. त्यामुळे अडचणीतल्या शेतकऱ्यांनी बाजारपेठेत उडीद-मुगासारखेच मिळेल त्या भावात सोयाबीचीही विक्री करून अडचण भागविली; तसेच शासनाने आयात तेलावरील टॅक्‍स वाढविल्याने खुल्या मार्केटमध्ये सोयाबीनचे भाव वाढले. ज्यांच्याकडे सोयाबीन शिल्लक आहे अशा काही मोठ्या शेतकऱ्यांनी आणखी भाव वाढतील या आशेवर आपला माल बाजारपेठेत आणला नाही. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारातील आजचा सोयाबीनचा लिलाव झालेला भाव २ हजार ८५४ ते २ हजार ९२१ आहे. शिवाय आजमितीला गतवर्षी ९६ हजार ४१८ क्विंटल असणारी आवक यावर्षी दीड पटीहून अधिक १ लाख ५४ हजार ७५५ क्विंटल झाली आहे. तर बाजूलाच असलेल्या औसा तालुका खरेदी-विक्री संघाच्या हमीभाव केंद्रात सोयाबीनची २ हजार ८२ खरेदी, उडीद २ हजार ८५८ क्विंटल व मुगाची खरेदी ४७४ क्विंटल झाली आहे. यावरून ऑनलाइन खरेदीच्या कागदपत्रांची पूर्तता, मालाच्या ग्रेडची झंझट हे सर्व व्यापारीवर्ग करू शकतात तसे शेतकऱ्यांना जमत नसल्याने त्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT